शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘तपासाबाबत एसीबी कुचकामी’

By admin | Updated: March 1, 2017 06:21 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या तपासात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे

मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या तपासात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे आणि त्यांच्या माजी संचालकांचीही चौकशी सुरू आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने एसीबीला तपासकामात कुचकामी ठरवत मुंबई महापालिकेच्या रस्ते व नालेसफाई घोटाळ्याचा तपास एसीबीकडे वर्ग करण्यास स्पष्ट नकार दिला. मुंबई पोलिसांनीच या प्रकरणाचा तपास सुरूच ठेवावा, असे यावेळी उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.कोट्यवधी रुपयांच्या रस्ते व नालेसफाई घोटाळ्याचा तपास एसीबीकडे वर्ग करावा, अशी मागणी भाजपाचे मुंबई सरचिटणीस विवेकानंद गुप्ता यांनी उच्च न्यायालयात केली आहे. न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवरील सुनावणी होती. ‘भूतकाळातील अनुभव पाहता आम्ही एसीबीकडे या प्रकरणाचा तपास वर्ग करण्यास इच्छुक नाही. एकदा का तपास एसीबीकडे वर्ग केला की त्यांचे अधिकारी काहीही करत नाही. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने सादर केलेल्या अहवाल पाहिला तर एसीबीने तपास केलेल्या केससमध्ये शिक्षा होण्याच्या प्रमाण शून्य टक्के आहे. एसीबीच्या माजी संचालकांची चौकशीही करण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणाचा तपास एसीबीकडे वर्ग करणार नाही,’ अशी सणसणीत चपराक उच्च न्यायालयाने एसीबीला लगावली. (प्रतिनिधी)>अहवाल सादर : गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने विशेष तपास पथक आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला (ईओडब्ल्यू) आतापर्यंत काय तपास करण्यात आला आहे, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दोन्ही तपास यंत्रणांनी उच्च न्यायालयात अहवाल सादर केला. अहवाल वाचल्यानंतर खंडपीठाने तपास यंत्रणांना तपास जलदगतीने करण्याचे निर्देश दिले.