शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

एसीबीची हेल्पलाईन लयभारी !

By admin | Updated: January 4, 2015 01:02 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेली हेल्पलाईन ‘लयभारी’ ठरली आहे. १०६४ क्रमांकाच्या या हेल्पलाईनवर सहा महिन्यात २७०० कॉल्सवजा तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्या आधारे २७ सापळे

६ महिन्यात २७ सापळे : २७०० तक्रारीनरेश डोंगरे - नागपूरलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेली हेल्पलाईन ‘लयभारी’ ठरली आहे. १०६४ क्रमांकाच्या या हेल्पलाईनवर सहा महिन्यात २७०० कॉल्सवजा तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्या आधारे २७ सापळे यशस्वी करण्यात एसीबीच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.एसीबीचे डीजी (महासंचालक) म्हणून अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सहा महिन्यांपूर्वी सूत्रे हाती घेतली. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. हेल्पलाईन हा त्यातीलच एक भाग. १०६४ या टोल फ्री क्रमांकावर कधीही फोन करा, फोन करून अपसंपदा जमविणारे, भ्रष्टाचार करणारे यांची ठोस माहिती द्या, असेही सुचविण्यात आले. त्याचा चांगला फायदा झाला. अवघ्या ६ महिन्यात हेल्पलाईनवर २६९९ कॉल्स आलेत. त्यातील अनेक कॉल्स चुकीची माहिती देणारे असले तरी २७ जणांनी अगदी तंतोतंत माहिती दिली. त्याचा फायदा उचलत एसीबीच्या राज्यभरातील युनिटने रचलेले २७ सापळे यशस्वी झाले.नागपुरात महिन्याला ३०० नागपूर विभागात या हेल्पलाईनवर २४ तासात साधारणत: ८ ते १२ कॉल्स येतात. अर्थात्, महिन्याला साधारणत: ३०० फोन कॉल्स प्राप्त होतात. यातील अनेक कॉल्स नुसते भंडावून सोडणारे असतात. अनेकजण फालतूची चौकशीही करतात. मात्र, काही कॉल्स करणारी मंडळी भ्रष्ट लोकसेवकांना पकडण्यासाठी कामी येईल, अशी माहिती देतात. अधिकारी या माहितीचा उपयोग चौकशीसाठी करतात. चौकशीचे रूपांतर कारवाईच्या यशस्वीतेत होते. सर्वाधिक लाभ नागपूरला एसीबीच्या हेल्पलाईनचा सर्वाधिक लाभ नागपूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी उचलला. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक फोन (कॉल) वरून मिळालेल्या माहितीची कसून तपासणी केली. त्याआधारे नागपूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई, पुण्याला मागे सारत गोंदियात ११ आणि नागपूरमध्ये ६ सापळे यशस्वी करून दीड डझन भ्रष्ट लोकसेवकांच्या मुसक्या बांधल्या. भंडारा २, अमरावती १, मुंबई ३, सोलापूर, जालना, बीड आणि उस्मानाबाद असे प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण २७ सापळे यशस्वी करून ३५ पेक्षा जास्त भ्रष्टाचाऱ्यांना गजाआड करण्यात हेल्पलाईनचा फायदा झाला. (प्रतिनिधी)