शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

संसदेतल्या उपाहारगृहापेक्षाही अकोल्यात मिळते स्वस्त जेवण !

By admin | Updated: July 29, 2016 19:39 IST

अत्यंत कमी किमतीत जेवन करायचे असेल, तर तुम्हाला राजधानी दिल्ली येथील संसद भवनच्या कँटीनमध्ये जावे लागेल.

अतुल जयस्वाल/ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 29 - अत्यंत कमी किमतीत जेवण करायचे असेल, तर तुम्हाला राजधानी दिल्ली येथील संसद भवनच्या कँटीनमध्ये जावे लागेल. ते शक्य नसल्यास अकोल्यात या, येथे तुम्हाला दहा रुपयांत जेवण मिळू शकते. केवळ पैसे नाहीत म्हणून कोणी उपाशी राहू नये, या उद्देशाने येथील अशोक बनकर ध्येयवेड्या तरुणाने गत २५ वर्षांपूर्वी सुरु केलेला दहा रुपयांत दहा पुऱ्या व एक प्लेट सोयाबीनची रस्सेदार भाजी देण्याचा हा व्यवसाय आजतागायत सुरु आहे. श्रमीकांपासून बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत येथे येऊन आपली क्षुधा भागवताना दिसतात.

अशोक बनकर यांचे वडील रामभाऊ बनकर यांचे जनता बाजारात २८ वर्षांपूर्वी एक छोटेसे हॉटेल होते. त्यामुळे या व्यवसायाची त्यांना पार्श्वभूमी होतीच. या व्यवसायाला आणखी वाढविण्याच्या दृष्टीने अशोक यांनी त्यांच्या भावासोबत नेहरु पार्क चौकात नाश्ताची गाडी सुरु केली. यावेळी त्यांच्या मनात लोकांना कमी पैशात जेवन देण्याचे विचार घोळू लागले. हा विचार प्रत्यक्षात आणत त्यांनी २५ वर्षांपूर्वी दुसरी गाडी सुरु करून एका रुपयात पुरी भाजी देणे सुरु केले. सुरवातीला एक किलो कणिकच्या पुऱ्या व दोन किलो बटाटा-वांग्याची भाजी असा सुरु झालेला हा प्रवास आता ५० किलो कणकेच्या पुऱ्या आणि मोठा गंज भरून सोयाबीनची भाजीपर्यंत आला आहे.

नेहरु पार्क जवळच्या पाण्याच्या टाकीजवळ अशोक यांची गाडी असून सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत येथे दहा रुपयांत जेवन मिळते. २५ वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. येथे दररोज साधारणत: ५०० ते ६०० जण जेवतात. या कामात मदत करण्यासाठी त्यांनी मदतनिस ठेवले आहेत. त्यांच्या या व्यवसायामुळे १२ ते १५ लोकांना रोजगारही प्राप्त झाला आहे. चव आणि दर्जा याबाबत कोणतीही तडजोड न करणाऱ्या अशोक यांच्या गाडीवरचे जेवण करण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी होत असते. उर्जेसाठी सोयाबीनची भाजीअशोक यांच्या गाडीवर येणारे लोक मुख्यत्वे श्रमीकवर्गातील आहेत. दिवसभर काम करताना त्यांना जेवनातून उर्जा मिळावी, या हेतूने प्रथिनांनी समृद्ध असलेल्या सोयाबीनच्या वड्यांची भाजी या ठिकाणी मिळते. दहा पुऱ्या व भाजीमधून मिळणारी उर्जा दिवसभर पुरते, असे येथे जेवण करणारे सांगतात.