शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

एसी लोकलला पावसाळ्यात मुहूर्त

By admin | Updated: March 9, 2017 01:28 IST

बहुचर्चित एसी लोकल (वातानुकूलित) सुरू होण्यास मुहूर्त मिळालेला नाही. ही लोकल धावण्यासाठी आता पावसाळ्याचा मुहूर्त लागणार आहे. मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या चाचण्या

मुंबई : बहुचर्चित एसी लोकल (वातानुकूलित) सुरू होण्यास मुहूर्त मिळालेला नाही. ही लोकल धावण्यासाठी आता पावसाळ्याचा मुहूर्त लागणार आहे. मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या चाचण्या होणे बाकी असून, अद्यापही चाचण्यांना सुरुवात झालेली नाही. त्यानंतर, पश्चिम रेल्वेवरही चाचण्या होतील. मध्य व पश्चिम रेल्वेवर चाचण्या होण्यासाठी १६ आठवडे म्हणजेच साधारपणे चार महिने लागतील. त्यानंतर, एसी लोकल धावेल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. ५४ कोटी रुपये किमतीची व बारा डब्यांची एसी लोकल साधारपणे दहा महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली. ही लोकल दाखल झाल्यानंतर, लोकलमध्ये काही तांत्रिक समस्या असल्याचे निदर्शनास आले. या समस्या सोडवण्यास काही दिवस लागल्यानंतर, एसी लोकलच्या कारशेडमध्येच चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर, लोकलच्या चाचण्या कारशेडबाहेरही घेण्यात येणार होत्या, परंतु आरडीएसओ (रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड आॅर्गनायझेशन) आणि भेल (भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड) कंपनीकडून काही तांत्रिक अडचणींमुळे कारशेडबाहेरही चाचण्या घेण्यात आलेल्या नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे, मध्य रेल्वेवर एसी लोकल धावण्याचे निश्चित असतानाच, ही लोकल चालवण्यास मध्य रेल्वेने नकार दिला व पश्चिम रेल्वेने लोकल चालवावी अशी मागणी केली. त्यानुसार, पश्चिम रेल्वेने आपल्या मार्गावर लोकल विनाअडचण धावू शकते, असा सकारात्मक प्रतिसाद देत, रेल्वे बोर्डाकडे मंजुरी मागितली आहे, ती मंजुरीही अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, या अडचणी असतानाच मध्य रेल्वेवर कारशेडबाहेर एसी लोकलच्या चाचण्या घेण्यास तब्बल १२ आठवडे लागणार असल्याचे समोर आले आहे. साधारपणे १२ ते १४ चाचण्या या दरम्यान घेण्यात येतील. त्यानंतर, या लोकलच्या पश्चिम रेल्वेवरही चाचण्या घेण्यात येणार असून, जवळपास चार आठवडे चाचण्या होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर, एसी लोकल धावेल. हे पाहता एसी लोकल धावण्यास पावसाळ्याचा मुहूर्त येईल. रेल्वे बोर्डाकडून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल चालवण्यास परवानगी मिळाली आणि त्यानंतर निर्णयात थोडा बदल होऊन मध्य रेल्वेवरील चाचण्या कमीदेखील होऊ शकतात, परंतु नियमानुसार तशा चाचण्या कमी होणे शक्यही नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ती धावणार कधी? हे गुलदस्त्यातच आहे. (प्रतिनिधी)रेल्वे बोर्डाकडून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल चालवण्यासाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही. लवकरच परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आहे. - मुकुल जैन, पश्चिम रेल्वे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक