शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
5
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
6
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
7
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
8
संपादकीय: विवेकाला बळ, पण...
9
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
10
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
12
बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई 
13
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
14
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
15
...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला
16
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
17
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
18
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
19
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण
20
मोदी हिंदी पट्ट्यात लावणार जोर; महाराष्ट्र, प. बंगालवरही फोकस

लग्नातील अनिष्ट प्रथांना तिलांजली

By admin | Published: March 03, 2017 3:10 AM

दारु, ताडी, माडी, कपड्याचे-भांड्याचे मान-पान, मांसाहारी भोजन आदी अनिष्ट-रूढी परंपरा बंद करण्याचा ठराव गाव मेळाव्यात केला

विक्रमगड : शंभर टक्के आदिवासी समाज असलेल्या डोल्हारी गावाने लग्न समारंभात दारु, ताडी, माडी, कपड्याचे-भांड्याचे मान-पान, मांसाहारी भोजन आदी अनिष्ट-रूढी परंपरा बंद करण्याचा ठराव गावमेळाव्यात केला आहे. त्यामुळे या पुढे डोल्हारी गावातील सर्व विवाहसोहळे अत्यंत साधेपणे होतील. या वेळी गावातील पारंपारीक सांस्कृतिक रुढींना उजाळा देण्यात आला. या वेळी नागरिकांनी तारपा नृत्य, तुर नाच, ढोल नाच, तांबडनाच सादर केले. तसेच या ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय नोकरीस लागलेल्यांच्या सत्कार करण्यात आला. तसेच गावाचा एकोपा व्हावा म्हणून अनेक सांस्कृतिक कार्यक्र म करण्यात आले. या वेळीच आदिवासी समाज का मागे पडला? यावर चिंतन करण्यात आले. त्यात लग्न सोहळ्यातील भरमसाठ उधळपट्टीमुळेच अनेक आदिवासी कुंटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गावातील नागरिकांच्या सर्वानुमते या उधळपट्टीला चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. साखरपुडा, मुलगा, अथवा मुलगी बघणे, हळद हे सोहळे देखील अत्यंत साधे पणाने करण्याचे ठरविण्यात आले. हे सोहळे कौटुंबिक स्वरुपाचे आहेत. त्याला दोन कुटुंबातील व्यक्तीच उपस्थित असायच्या शिरा, पोहे अथवा चहा, कॉफी यावरच ते साजरे व्हायचे परंतु नंतर असलेल्या अथवा नसलेल्या संपत्तीच्या प्रदर्शनाच्या हव्यासातून त्यावर उधळपट्टी होऊ लागली. ती थांबलीच पाहिजे, असे ठरले. यातून होणाऱ्या बचतीचा पैसा नवदाम्पत्याच्या शिक्षण अथवा संसारासाठी वापरावा असेही यावेळी ठरविण्यात आले. आदिवासी समाजात कुणाचे लग्न करायचे म्हटले की वधू-वर पक्षाच्या कुटुंबियाचे कंबरडेच मोडते. हळदी-कुंकू, वधूवराला पहायला जाणे, मांडव समारंभ, लग्न असा २-३ दिवसांचा कार्यक्रम असतो. खाणाऱ्या-पिणाऱ्यांची चांगलीच चंगळ असते. मांसाहाराच्या बेताशिवाय विवाह पूर्णच होत नाही. याशिवाय तळीरामांचा घसा ओला करण्यासाठी विशेष सोय करावी लागते. त्यासाठी दारु, ताडी, माडी याचा वापर होतो. त्याच्या प्राशनाने लग्नात वाद-विवाद, भांडणे या मुळे विघ्ने येतात. लग्न कार्यात नातेवाईकांचा मानपान, आहेर करताकरता कुटुंब कर्जाच्या विळख्यात सापडतात. हे ओळखून हा निर्णय घेतला गेला.>आमच्या गावात लग्न समारंभात अनिष्ट चाली, रूढींना फाटा देण्याचा निर्णय आम्ही गाव मेळाव्यात एकमुखाने घेतला. विशेषत: साखरपुडा व लग्न समारंभातील अनावश्यक होणारी उधळण, दारु, ताडी, साड्या मान-पान देण्याची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.- किरण गहला, ग्रामस्थआमच्या आदिवासी समाजात लग्नाच्या अवास्तव खर्चामुळे अनेक आदिवासी कुटुंबे कर्जाच्या खाईत खितपत आहेत. त्याचा विपरीत परिणाम पुढील पिढीच्या शिक्षणावर होतो. तरु णांनी याची दखल घेऊन हे नवे पाऊल टाकले आहे. आम्ही आमच्या गावापासून सुरवात केली आहे. आता इतरांनी त्याचे अनुकरण करावे. - राजा गहला, जेष्ठ ग्रामस्थ