शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अवसरीत रोडरोमिओंचा उच्छाद

By admin | Updated: September 19, 2016 01:16 IST

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) गावात रोडरोमिओंमुळे येथील मुली त्रस्त झाल्या आहेत.

अवसरी : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) गावात रोडरोमिओंमुळे येथील मुली त्रस्त झाल्या आहेत. मंचर व अवसरी खुर्द कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलींना पायी जात असताना हे रोडरोमिओ मोटारसायकलने कट मारणे, अश्लील भाषेत बोलणे, एसएमएस पाठविणे असे घाणेरडे प्रकार करत आहे. अवसरी खुर्द एसटी स्टँडखालची वेस, श्री भैरवनाथ विद्यालय परिसरात रोडरोमिओंचा उच्छाद वाढला आहे. विद्यालयाने शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिपायांचा बंदोबस्त ठेवला आहे. या रोडरोमिओंवर कारवाईची मागणी विद्यार्थिनी, पालक तसेच कॉलेज प्रशासनाने केली आहे. अवसरी खुर्द गावात शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी कॉलेज श्री भैरवनाथ विद्यालय व उच्च माध्यमिक असल्याने या विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी राज्यातून व राज्याबाहेरून मुक्त शिक्षण घेण्यासाठी अवसरीत आल्या आहेत. त्यापैकी काही मुली शासकीय हॉस्टेलमध्ये वास्तव्यास आहेत, तर काही मुली अंतर असल्याने समूहाने पायी जात येत असतात. विद्यालय चालू-बंद होण्याच्या दरम्यान अवसरी खुर्द गावातून स्थानिक व बाहेरगावातील रोडरोमिओ मोटारसायकलवर तीन तीन बसून पायी चाललेल्या मुलींना कट मारणे, शेजारून जाताना अश्लील भाषेत बोलणे हे प्रकार वारंवार करत आहेत. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कॉलेज परिसरात रोडरोमिओंना चोप दिला होता. मात्र, यानंतरही पुन्हा रोडरोमिओंचा वावर वाढला आहे. त्याच्याप्रमाणे अवसरी खुर्द गावच्या पश्चिमेला श्री भैरवनाथ विद्यालय व उच्च माध्यमिक महाविद्यालय आहे. हे विद्यालय चालू-बंद ूहोण्याच्या वेळेत रोडरोमिओ मोटारसायकलवरून हेलपाटे मारत असतात. विद्यालयाच्या वतीने मुख्य प्रवेशद्वारी एक शिपाई संरक्षणासाठी ठेवला आहे. (वार्ताहर)>पुढाऱ्यांचा दबाव : कारवाईची मागणीमंचर पोलीस एसएमएस पाठविणाऱ्या टुकार रोडरोमिओंना राजकीय पुढारी पाठीशी घालत आहेत. पोलिसांत कारवाई करू नये म्हणून पुढारी दबाब आणतात. मंचर पोलिसांनी दबाब आणणाऱ्या पुढाऱ्यांना बळी पडू नये व रोडरोमिओंचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालक करत आहेत.