मुंबई : आर्थररोड मध्यवर्ती कारागृहात गँगस्टर मुस्तफा डोसाने चमचाने हल्ला केल्याप्रकरणी शुक्रवारी गँगस्टर अबू सालेमने महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर साक्षीदार म्हणून साक्ष दिली. महत्त्वाचे म्हणजे हा हल्ला चमचाने करण्यात आला की दुसऱ्या कोणत्या हत्याराने, हे सांगता येत नसल्याचेही अबूने न्यायालयाला सांगितले. डोसा कारागृहात सिगारेट ओढायचा. त्याला एकदा दुपारच्या वेळेत बरॅक बाहेर ठेवण्यात आले. आणि हे सर्व कारागृहाचे नियम धाब्यावर बसवून सुरू होते. त्यामुळे याची तक्रारही मी कारागृह प्रशासनाकडे केली. पण प्रशासनाने मला याची लेखी तक्रार देण्यास सांगितले. तसेच डोसाने मला जीव ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी साक्ष अबूने दिली. मात्र कारागृहाचे नियम मला माहिती नाही व डोसाची लेखी तक्रार मी कारागृह प्रशासनाकडे केली नव्हती, असेही अबूने न्यायालयासमोर स्पष्ट केले. ही घटना जुलै २०१० मध्ये घडली.
अबू सालेमने दिली साक्ष
By admin | Updated: April 11, 2015 02:29 IST