शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अबू आझमींच्या भाच्याला अटक

By admin | Updated: June 8, 2017 06:59 IST

दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने मंगळवारी अबू असलम कासिम नामक तरुणाला वाकोल्यातील पंचतारांकित हॉटेलमधील एका रूममधून अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने मंगळवारी अबू असलम कासिम नामक तरुणाला वाकोल्यातील पंचतारांकित हॉटेलमधील एका रूममधून अटक केली. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीमध्ये त्याचा सहभाग असल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे.वाकोल्याच्या ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये कासिम लपल्याची माहिती दिल्लीच्या स्पेशल सेलचे पोलीस उपायुक्त संजीव यादव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने या हॉटेलमधून कासिमला अटक केली. या ठिकाणी तो त्याच्या मैत्रिणीसोबत आला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे वाकोला पोलिसांकडून सांगण्यात आले. कासिम हा मुंबई समाजवादी पक्षाचे नेते अबू असिम आझमी यांचा भाचा असून, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटमध्ये त्याचा सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एका ठिकाणी धाड टाकत अमलीपदार्थांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. ज्याची किंमत सुमारे चाळीस कोटी रुपये आहे. या प्रकरणी तिघांना दिल्ली पोलिसांनी अटक करत त्यांची चौकशी सुरू केली. हे अमलीपदार्थ कासिमनेच त्यांना पुरविले असून, अमलीपदार्थांचा तो देशातील मोठा तस्कर असल्याचेही ते म्हणाले. तेव्हापासून दिल्ली पोलिसांची कासिमवर नजर होती. समुद्रमार्गे अमलीपदार्थांची तस्करी तो करत होता. दुबईमध्ये असलेल्या कैलाश राजपूत नामक इसमाचेही नाव या प्रकरणी पुढे आले आहे. राजपूत दुबईतून अमलीपदार्थ कासिमला पुरवत होता. कासिमनंतर मुंबई, दिल्ली तसेच अनेक मोठ्या शहरांमध्ये त्याचा पुरवठा करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.>कार्गो कंपनीत झाली ओळखबारावीतून शाळा सोडलेला कासिम दुबईत दनाट कार्गो कंपनीत २००८ सालापर्यंत काम करत होता. नंतर त्याने गोव्यात ओशियन विंग या कंपनीत २०१० ते २०१३पर्यंत काम केले. त्यानंतर हनिफ नावाच्या एका मित्रामुळे कासिमची ओळख कैलाश राजपुतशी झाली. तो दुबईतील कुख्यात ड्रग सप्लायर आहे. रातोरात श्रीमंत होण्याच्या स्वप्नातून कासिमने राजपुतशी हातमिळवणी केली आणि तो या व्यवसायात आला, असे सूत्रांनी स्पष्ट केले. अमेरिकेतही पुरवठाकासिम हा जगभरात अमलीपदार्थांची तस्करी करत होता. तसेच अमेरिकेतही कुरिअरमार्फत तो ड्रग्ज सप्लाय करत असल्याचीही माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने सध्या तपास सुरू आहे. ज्यात अजून काही लोकांना अटक होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.