शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

दहशतवादी अबू फैजलच्या अटकेपासून एटीएस मुकले

By admin | Updated: July 11, 2014 09:01 IST

बुलडाणा जिल्ह्यातील दहशतवादी कृत्यप्रकरणी सीमी व इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अबू फैजल इम्रानखान याच्या अटकेपासून एटीएसला मुकावे लागेल.

मध्य प्रदेश पोलिसांचे मिळाले नाही एस्कॉर्ट : पुन्हा प्रयत्ननागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-सैलानी येथील दहशतवादी कृत्यप्रकरणी सीमी आणि इंडियन मुजाहिद्दीनचा सक्रिय कार्यकर्ता जहाल दहशतवादी डॉ. अबू फैजल इम्रानखान याला नागपुरात आणण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांचे ‘एस्कॉर्ट’ न मिळाल्याने दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) तूर्त त्याच्या अटकेपासून मुकावे लागले. अबूला मध्य प्रदेश पोलिसांनी नागपूरच्या न्यायालयात हजर करावे, यासाठी नव्याने वॉरंट जारी करण्याच्या संदर्भात १६ जुलै रोजी एटीएस पुन्हा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.डी. परवाणी यांच्या न्यायालयात अर्ज करणार आहे. अबू फैजल हा सध्या भोपाळच्या कारागृहात आहे. त्याला नागपूरच्या न्यायालयात हजर करण्याच्या संदर्भात या न्यायालयाने २७ जून २०१४ रोजी वॉरंट जारी केला होता. हा वॉरंट आधी भोपाळच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात गेला. या न्यायालयाने अबूला नागपूरच्या न्यायालयात हजर करण्यात यावे यासाठी तेथील जेल अधीक्षकाच्या नावे वॉरंट जारी केला. येथील कारागृह प्रशासनास अबूला नागपुरात नेण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांचा एस्कॉर्ट उपलब्ध झाला नाही. मध्य प्रदेशचे काही पोलीस कर्मचारी आज नागपुरात आले आणि त्यांनी स्थानिक एटीएसला ही माहिती दिली. लागलीच पोलीस निरीक्षक व्ही. डी. मिश्रा हे विशेष सरकारी वकील प्रशांतकुमार सत्यनाथन यांच्यासह प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी अबूच्या वॉरंटसाठी नव्याने अर्ज करता यावा म्हणून तारीख मागितली. न्यायालयाने १६ जुलै ही तारीख मंजूर केली. मध्य प्रदेश पोलिसांनी अबूला नागपूरच्या न्यायालयात हजर केल्यानंतर एटीएसचे पथक त्याला सैलानी दर्गाप्रकरणी अटक करणार आहेत. अबूचा मोमीनपुऱ्यात संचारया गटाचा म्होरक्या डॉ. अबू फैजल आहे. हे सर्व दहशतवादी मध्य प्रदेश आणि विदर्भाचे नेटवर्क सांभाळून होते. अबू हा २६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आहे. २००९ मध्ये खंडव्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यात या दहशतवाद्यांविरुद्ध भादंविच्या ३०७, २९५, १२४ अ, १५३ क, १२० ब, २१२, ३४, शस्त्र कायद्याच्या २५, २७, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या ३ (१०), (१३), (१५), (२०) कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. सामान्य आणि विशेष नागरिकांच्या हत्येचा प्रयत्न करून सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी दहशतवादी कृत्य करणे, असा आरोप या गटावर आहे. अकिल खिलजी हा बाबरी विध्वंसानंतर सक्रिय झालेला आहे. तो मुस्लीम तरुणांमध्ये जिहादची भावना निर्माण करायचा, खलील हा त्याचा मुलगा आहे. अबरार हा मोमीनपुरा भागात राहिलेला आहे. खांडवा येथे एटीएसच्या शिपायाला गोळ्या घालून ठार केल्यानंतर अबरार हा एटीएसच्या रडारवर आला होता. अबरार हा मोमीनपुऱ्यात आश्रयाला असताना त्याला अबू फैजल भेटायचा.