शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपीला अखेर अटक

By admin | Updated: June 27, 2016 05:03 IST

सुनील गवळी उर्फ कोडी याला अखेर तीन महिन्यांनी अटक करण्यात वर्तकनगर पोलिसांना यश आले आहे.

ठाणे : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी तसेच घराचे बांधकाम केले म्हणून १० हजारांची खंडणी उकळण्याकरिता संजय यादव (३०) याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सुनील गवळी उर्फ कोडी याला अखेर तीन महिन्यांनी अटक करण्यात वर्तकनगर पोलिसांना यश आले आहे. हल्ल्यासाठी त्याने वापरलेला लोखंडी खलबत्ता पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दीड महिन्यापूर्वी अन्य एक आरोपी राजकुमार दुबे याला सांताक्रुझमधून अटक केली होती.या प्रकरणातील सुनील तिवारी उर्फ नाटा, राकेश उर्फ कल्लू तिवारी हे त्यांचे उर्वरित साथीदार अद्यापही पोलिसांना हुलकावण्या देत आहेत. गवळी आणि राजकुमार दुबेसह पाच जणांच्या टोळीने संजयवर १० मार्च रोजी लोकमान्यनगर भागात खुनी हल्ला केला. एका भांडणात ४ मार्च रोजी संजयने मध्यस्थी केली होती. त्याच्याकडे घराच्या बांधकामावरूनही पैशांची मागणी करण्यात आली. यातूनच उद्भवलेल्या वादातून हा हल्ला झाला. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात हाणामारी, शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून वर्तकनगर पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. सहायक पोलीस निरीक्षक एस.एल. गायकवाड, हवालदार माणिक आहेर, भूषण गावडे, सुनील निकम, तात्या बल्लाळ, गोरक्षनाथ दराडे, भागवत दहिफळे आणि हेमंत पगारे आदींच्या पथकाने गवळीला येऊरच्या जंगलातून २० जून रोजी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, त्याची रवानगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात केली आहे. (प्रतिनिधी)