शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्य निवडणूक आयुक्तांवर बेकायदा निर्णयाबद्दल ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 06:13 IST

अधिकारांचे उल्लंघन : ग्रामपंचायत निवडणूक रद्द करणे गैर

मुंबई : निवडणूक अधिकाऱ्याच्या संगनमताने काही पात्र उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवून फेटाळण्यात आले आहेत व काही अपात्र उमेदवारांचे अर्ज मुद्दाम वैध ठरविण्यात आले आहेत, असे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाले तरी राज्य निवडणूक आयोग त्याआधारे एखाद्या ग्रामपंचायतीची जाहीर झालेली निवडणूक पूर्णपणे रद्द करू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. एवढेच नव्हे तर अधिकारांचे उल्लंघन करून अशा प्रकारे सोलापूर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द केल्याबद्दल न्यायालयाने राज्य निवडणूक आयुक्त जगेश्वर सहारिया यांच्यावर कडक शब्दांत ताशेरेही ओढले.

उमेदवारी अर्ज अयोग्य पद्धतीने वैध ठरविणे किंवा फेटाळणे याविषयीचा वाद रीतसर साक्षीपुरावे घेऊनच निकाली काढला जाऊ शकतो. म्हणूनच अशा वादात निवडणूक झाल्यानंतर विजयी उमेदवाराच्या निवडीविरुद्ध सक्षम न्यायालयात याचिका करणे एवढाच मार्ग कायद्याने दिलेला आहे. असे असूनही निवडणूक आयोगाने स्वतंत्र व नि:ष्पक्ष निवडणूक घेण्याची जबाबदारी व निवडणूक पर्यवेक्षणाचे सर्वाधिकार यांचा दाखला देत अशा तक्रारींवरून जाहीर झालेली एखादी निवडणूक ऐनवेळी रद्द करणे म्हणजे कायद्याच्या प्रस्थापित व्यवस्थेला सुरुंग लावणे आहे, असेही न्यायालयाने म्हटले.याखेरीज न्यायालयाने असेही म्हटले की, ज्यांचे उमेदवारी अर्ज फेटाळले गेले होते त्यांच्यापैकी काही जणांनी याचिका केली असता, सुरु झालेल्या निवडणूक प्रक्रियेत आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे म्हणून उच्च न्यायालयाने निवडणूक रद्द करण्यास नकार दिला होता. तरीही त्याच आधारे आयोगाने निवडणूक रद्द करणे म्हणजे न्यायालयावर कुरघोडी करणे आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील खुणेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादात न्या. रवींद्र बोर्डे व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. राज्यभरातील २६ जिल्ह्यांमधील अन्य हजारो ग्रामपंचायतींसोबत खुणेश्वर ग्रामपंचायतीची निवडणूकही आयोगाने १ नोव्हेंबर २०५ रोजी घ्यायचे जाहीर केले होते. त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाली व वरीलप्रकारचे आरोप करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून दिलेल्या अहवालाच्या आधारे निवडणूक आयुक्त सहारिया यांनी ठरलेली निवडणूक रद्द करण्याचा आदेश मतदानाच्या आदल्या दिवशी काढला होता. त्याविरुद्ध याचिका केली गेली होती.

पाच वर्षें प्रशासकाच्या ताब्यातखुणेश्वर ग्रामपंचायतीची १ नोव्हेंबर २०१५ रोजी व्हायची निवडणूक रद्द करून आयोगाने नंतर काही दिवसांतच निवडणूक घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यास अंतरिम स्थगिती देऊन ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमला होता. याचिका प्रलंबित राहिल्याने ही ग्रामपंचायत गेली सुमारे पाच वर्षे प्रशासकाच्या ताब्यात राहिली. आता न्यायालयाने पूर्णपणे नव्याने निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे.