शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कला केंद्रात विकलेल्या तरुणीवर वारंवार अत्याचार करून गर्भपात !

By admin | Updated: April 3, 2017 22:28 IST

लग्नाचे आमिष दाखवून एका २१ वर्षीय युवतीवर जबरदस्तीने वारंवार अत्याचार तसेच तिचा गर्भपात केल्याप्रकरणी

आॅनलाईन लोकमत
 सातारा, दि. 3 - लग्नाचे आमिष दाखवून एका २१ वर्षीय युवतीवर जबरदस्तीने वारंवार अत्याचार तसेच तिचा गर्भपात केल्याप्रकरणी वडोली (भि.) ता. कऱ्हाड येथील एका तरुणासह अन्य चारजणांवर उंब्रज पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, या तरुणीला इस्लामपूरच्या कला केंद्रात दहा हजार रुपयास विकल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. 
  अमोल धनपूर्णा, माधुरी धनपूर्णा दोघे (रा. सूर्यनगर, अहमदनगर), सविता काळे (रा. इस्लामपूर, नूतन कला केंद्र), विनोद रामचंद्र तुपे (रा. वडोली ( भि.), पप्पू (पूर्ण नाव माहीत नाही, रा. कऱ्हाड ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
 याबाबत पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, जून २०१३ मध्ये अमोल व त्याची आई माधुरी यांनी पीडित युवतीस लग्नाचे आमिष दाखवून घरी नेले होते. त्यानंतर संबंधित पीडित युवतीने वारंवार विचारले की, ‘लग्न कधी करायचे,’ यावर अमोल व माधुरी या दोघांनी पीडित युवतीस इस्लामपूर येथील नूतन कला केंद्रात सविता काळे या महिलेस दहा हजार रुपयास विकले. दरम्यान, कला केंद्रात विनोद नामक तरुण नाचगाणे पाहण्यासाठी येत होता. त्यावेळी पीडित युवती व विनोद यांची ओळख झाली. 
मार्च २०१६ मध्ये ‘मी तुझ्याशी लग्न करतो. तुला व्यवस्थित सांभाळेन,’ असे म्हणून इस्लामपूर येथून उंब्रज, ता. कºहाड येथील हॉटेल विसावा येथे युवतीस आणले. ‘आपण उद्या लग्न करू,’ असे म्हणत मारहाण करून शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर सलग दहा दिवस मारहाण करून पीडित युवतीवर अत्याचार केला. 
त्यानंतरही विनोद याने उंब्रज परिसरात भाड्याची खोली, तसेच वेगवेगळ्या हॉटेलवर नेऊन २९ मार्च २०१७ पर्यंत वारंवार अत्याचार केला. पीडित युवती पुन्हा गर्भवती राहिली असता तिला हाकलून दिले. यावर पीडित युवती विनोद याच्या वडोली (भि.) येथील राहत्या घरी गेली असता त्याने चाकू फेकून मारला व राहत्या घरातून हाकलून दिले,  असे  पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले असून, याप्रकरणी पाचजणांवर उंब्रज पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक कुमार घाडगे करीत आहेत. 
गर्भपात कऱ्हाडात.. अर्भक पुरले चाफळला !
पीडित युवती गर्भवती राहिली असता पीडित युवती विनोद यास ‘आपण लग्न करू,’ असे वारंवार म्हणत होती. मात्र, विनोद याचे अगोदरच लग्न झाले असल्यामुळे ‘आपण गर्भपात करू, मगच मी तुझ्याशी लग्न करेन,’ असे विनोद म्हणत होता. यावेळी पीडित युवती गर्भपात करण्यास तयार नव्हती म्हणून विनोदचा मेहुणा पप्पू याने युवतीस जीवे मारण्याची धमकी देऊन कºहाड येथील एका हॉटेलच्या पाठीमागे असणाºया डॉक्टरकडून पीडित युवतीचा जबरदस्तीने गर्भपात केला व संबंधित अर्भक चाफळ, ता. पाटण येथे एका जागी पुरले.