शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा अन्नत्याग!

By admin | Updated: August 12, 2015 23:11 IST

मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांनी घेतले कोंडून.

अकोला : प्रशासन विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप करीत अकोल्याच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गत तीन दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. प्रशासन मात्र ढिम्मच राहिल्याने, संतप्त विद्यार्थ्यांनी बुधवारी वसतिगृहातील साहित्याची नासधूस केली आणि प्रवेशद्वाराला कुलूप लावून स्वत:ला कोंडून घेतले. अकोला शहराच्या कृषिनगर परिसरात आदिवासी मुलांचे हे वसतिगृह आहे. त्याच्या छताला गळती लागल्याने शॉर्टसर्किटचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शिवाय सर्वच खोल्यांमध्ये पाणी साचत असल्याने शैक्षणिक साहित्य व इतर महत्त्वाच्या वस्तू भिजत आहेत. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांच्या आरोग्याला धोका झाला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराला कंटाळून विद्यार्थ्यांंनी जिल्हाधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकार्‍यांनाही निवेदन दिले; परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. परिणामी सोमवारपासून विद्यार्थ्यांनी अन्नत्याग केला. तरीही प्रशासनाकडून काहीच हालचाल न झाल्याने संतप्त विद्यार्थ्यांंनी वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून स्वत:ला कोंडून घेतले आणि इमारतीवरून तेथील वस्तूंची फेकाफेक केली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली; मात्र मागण्या मान्य होईस्तोवर विद्यार्थ्यांंनी कोणत्याही अधिकार्‍यांशी बोलण्यास नकार दिला. यासंदर्भात एकात्मिक आदिवासी विकास मंडळाचे प्रकल्प अधिकारी नितीन तायडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी इमारतीला गळती लागली असून, ही गंभीर समस्या असल्याचे सांगीतले. इतर समस्यांबाबत विद्यार्थ्यांंशी चर्चा करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगीतले.

**विद्यार्थी आजारी

   मूलभूत सुविधांसाठी गत तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांंनी अन्नत्याग केल्याने दोन विद्यार्थी आजारी पडले. त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.