शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा अन्नत्याग!

By admin | Updated: August 13, 2015 01:58 IST

प्रशासन विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप करीत अकोल्याच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गत तीन दिवसांपासून अन्नत्याग केला आहे.

अकोला : प्रशासन विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप करीत अकोल्याच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गत तीन दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. प्रशासन मात्र ढिम्मच राहिल्याने, संतप्त विद्यार्थ्यांनी बुधवारी वसतिगृहातील साहित्याची नासधूस केली आणि प्रवेशद्वाराला कुलूप लावून स्वत:ला कोंडून घेतले.अकोला शहराच्या कृषिनगर परिसरात आदिवासी मुलांचे हे वसतिगृह आहे. त्याच्या छताला गळती लागल्याने शॉर्टसर्किटचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शिवाय सर्वच खोल्यांमध्ये पाणी साचत असल्याने शैक्षणिक साहित्य व इतर महत्त्वाच्या वस्तू भिजत आहेत. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांच्या आरोग्याला धोका झाला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराला कंटाळून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले; परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. परिणामी सोमवारपासून विद्यार्थ्यांनी अन्नत्याग केला. तरीही प्रशासनाकडून काहीच हालचाल न झाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून स्वत:ला कोंडून घेतले आणि इमारतीवरून तेथील वस्तूंची फेकाफेक केली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली; मात्र मागण्या मान्य होईस्तोवर विद्यार्थ्यांनी कोणत्याही अधिकाऱ्यांशी बोलण्यास नकार दिला.इमारतीला गळती लागली असून, ही गंभीर समस्या आहे. ती निकाली लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतर समस्यांबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. - नितीन तायडे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास मंडळ, अकोलाविद्यार्थी आजारी मूलभूत सुविधांसाठी गत तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांनी अन्नत्याग केल्याने दोन विद्यार्थी आजारी पडले. त्यांना सर्वाेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.