शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अबब..! मूत्राशयातून काढले ५१ खडे.!

By admin | Updated: January 21, 2015 00:30 IST

मूत्रपिंडात खडा होण्याचे प्रकार आपण ऐकले आहेत. ‘‘तुमच्या मूत्रपिंडात १, २ एमएमचा खडा आहे,’’ असे डॉक्टर सर्रास सांगतात.

पुणे : मूत्रपिंडात खडा होण्याचे प्रकार आपण ऐकले आहेत. ‘‘तुमच्या मूत्रपिंडात १, २ एमएमचा खडा आहे,’’ असे डॉक्टर सर्रास सांगतात. पण, मोठ्या व्यक्तींच्या मूत्राशयामध्ये खडे झाले, असे सहसा ऐकिवात नाही. पण, एका रुग्णाच्या मूत्राशयातून शस्त्रक्रिया करून एक-दोन नव्हे, तर तब्बल ५१ खडे काढण्याची घटना ससून रुग्णालयात घडली. महत्त्वाचे म्हणजे, हिमोफिलिया रुग्णावर ससूनच्या डॉक्टरांनी जोखमीची असणारी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.संतोष हिरवे (वय २१) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर ससूनमधील सर्जरी विभागाचे प्रा. डॉ. सुधीर डुबे, सहायक प्रा. आविष्कार बारसे, मुख्य निवासी डॉक्टर वैभव शाह, भूलतज्ज्ञ डॉ. ए. पांडे, विजय पाटील यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. संतोषला हिमोफिलिया हा आजार आहे. संतोषच्या पोटात सारखे दुखायचे आणि चक्कर यायची. त्यामुळे त्याने काही खासगी डॉक्टरांना दाखविले. त्यांनी आजाराचे निदान केले; पण शस्त्रक्रिया करू शकत नसल्याचे सांगितले. हिमोफिलिया रुग्णांमध्ये अतिरिक्तस्राव होण्याचा धोका असतो. यामुळे हिरवे याच्यावर अनेक खासगी डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करणे टाळण्यात येत होते.संतोष त्याच्या आई आणि भावाबरोबर राहतो. संतोषची आई भाजीविक्रीचा व्यवसाय करते. संतोषला खासगी डॉक्टरांकडून तपासणी करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे तो ससूनमध्ये आला. याबाबत डॉ. डुबे म्हणाले, ‘‘संतोषवर आम्ही तपासणी, उपचार करून शस्त्रक्रिया केली. नियोजन करून करण्यात आलेली ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे.’’‘‘ससूनमध्ये आल्यावर इथल्या डॉक्टरांनी मला धीर दिला आणि माझ्यावर शस्त्रक्रिया करून मला एक प्रकारे जीवनदानच दिले,’’ अशी प्रतिक्रिया संतोष हिरवे याने दिली. या शस्त्रक्रियेत हिमोफिलिया सोसायटीचे डॉ. सुनील लोहाडे, राजीव गांधी योजनेच्या प्रमुख डॉ. भारती दासवानी, परिचारिका मनीषा भुजबळ, कर्मचारी सुबैया यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.(प्रतिनिधी)हिमोफिलियाचे ७०० रुग्णपुण्यात हिमोफिलिया सोसायटीकडे नोंदणी केलेले ७०० रुग्ण आहेत. हीमोफिलिया हा पुरुषांमध्ये आढळणारा आजार असून, संबंधित व्यक्तीला कोणत्याही प्रकारे इजा झाल्यास त्यामुळे होणारा रक्तस्राव लवकर थांबत नाही. अतिरक्तस्राव झाल्यामुळे रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते, अशी माहिती हिमोफिलिया सोसायटीचे डॉ. सुनील लोहाडे यांनी दिली.