शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

आबांची अंजनी पोरकी झाली

By admin | Updated: February 16, 2015 23:26 IST

कार्यकर्त्यांची धाव : गावातील व्यवहार बंद

सावळज : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाचे वृत्त येऊन धडकताच त्यांच्या गावी अंजनी येथे शोककळा पसरली. तासगाव पूर्व भागातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. त्यांचे बंधू सुरेश पाटील यांच्या गळ्यात पडून कार्यकर्ते भावनांना वाट मोकळी करून देत होते. आर. आर. आबांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. त्यांच्या निवासस्थानी बंधू सुरेश पाटील व इतर नातेवाईक होते. त्यांनाही मोठा धक्का बसला होता. निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यकर्ते हंबरडा फोडत सुरेश पाटील यांच्या गळ्यात पडून रडत होते. नेहमीच आबांच्या आगमनाने त्यांचे निवासस्थान गर्दीने फुलले होते. पण यावेळी मात्र त्या गर्दीवर शोककळा पसरली होती. सायंकाळी माजी मंत्री मदन पाटील, आमदार अनिल बाबर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन नातेवाईक व कार्यकर्त्यांचे सांत्वन केले. कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे, शिराळ्यातील मांगले, आळसंद या गावातही बंद ठेवून आदराजंली वाहिली. (वार्ताहर)तासगावात साडेसहा वाजता अंत्ययात्राउद्या मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता तासगाव येथील भिलवडी नाक्यातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. तासगावातील मार्केट कमिटी व अंजनीतील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजता अंजनी-वडगाव रस्त्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.