शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षातून उडी मारून अपहरणाचा डाव उधळला

By admin | Updated: October 7, 2016 05:07 IST

विरार खानिवडेजवळ शाळेतील दोन विद्यार्थ्यांना रिक्षातून पळवून नेण्यात येत असता त्यांनी प्रसंगावधान राखून रिक्षातून उड्या मारुन पळ काढल्याने अपहरणाचा डाव उधळला गेला.

पारोळ : विरार खानिवडेजवळ शाळेतील दोन विद्यार्थ्यांना रिक्षातून पळवून नेण्यात येत असता त्यांनी प्रसंगावधान राखून रिक्षातून उड्या मारुन पळ काढल्याने अपहरणाचा डाव उधळला गेला. वसई तालुक्यातील खानिवडे प्रतिभा विद्यामंदिराचे भालिवली येथे राहणारे विद्यार्थी आदित्य किसन घाटाळ इयत्ता ७ वी व विकी सुरेश भोये ६ वी हे दोन विद्यार्थी नेहमी प्रमाणे २९ सप्टेंबर रोजी घरातून खानिवडे शाळेत सकाळी ७.३० च्या सुमारास जात होते. सकाळची वेळ असल्याने या रस्त्यावर वर्दळ नव्हती. यावेळी एक अनोळखी रिक्षा त्यांच्या शेजारी येऊन थांबली व त्यात बसलेल्या चालकाने बसा मी तुम्हाला शाळेत सोडतो असे सांगितले. हे दोघेही विद्यार्थी रिक्षात बसले. ती काही अंतरावर पुढे गेल्यानंतर चालकाने दुसऱ्या कुणाशी मोबाईलवर संपर्क साधून हिंदीमध्ये संभाषण करतांना सांगितले कि, दो को हम ले आए है, आप तैयार रहना. हे हिंदी संभाषण आदित्यने ऐकले व आपल्याला काहीतरी धोका असल्याचे त्याच्या लक्षात आले. तेव्हा त्याने विकीला खुणेने रिक्षातून उडी मारण्यास सांगितले. रिक्षा सर्व्हिस रोडवरून मुख्य महामार्गावर जात असतांना वेग कमी असल्याने दोघांनीही बाहेर उड्या मारल्या. रिक्षाचालकास हे समजताच त्याने रिक्षा थांबवण्याऐवजी महामार्गावर मुंबई दिशेने निघून गेला . या दरम्यान आदित्यने न घाबरता रिक्षाच्या पाठीमागे नंबर शोधण्यासाठी नजर लावली परंतु रिक्षाला नंबरच नसल्याचे त्याच्या लक्षात आल्याचे त्याने या प्रसंगाविषयी बोलताना सांगितले . दरम्यान, तसेच उडी मारताना विकीला मार लागला आहे . दरम्यान भालिवली येथील इतर सवंगडी आल्यावर त्यांच्या बरोबर शाळेत येऊन घडलेला प्रसंग आदित्यने क्लास टीचरला सांगितला. यामुळे पोलिसांनी या रस्त्यावरील गस्त वाढविली आहे. (वार्ताहर)