शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘एबीसी’च्या अध्यक्षपदी व्यंकट बिनविरोध

By admin | Updated: September 24, 2016 03:57 IST

‘एबीसी’च्या अध्यक्षपदी ‘ईनाडू’चे संचालक आय. व्यंकट तर उपाध्यक्षपदी कोका-कोला इंडियाचे देबब्रत मुखर्जी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मुंबई : आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशन्स अर्थात ‘एबीसी’च्या अध्यक्षपदी ‘ईनाडू’चे संचालक आय. व्यंकट तर उपाध्यक्षपदी कोका-कोला इंडियाचे देबब्रत मुखर्जी यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड २०१६-१७ या वर्षासाठी आहे.व्यंकट हे मीडिया रिसर्च युजर्स कौन्सिल (एमआरयूसी) चेही अध्यक्ष असून त्यांनी अ‍ॅडव्हर्टायजिंग स्टॅन्डडर््स कौन्सिल आॅफ इंडिया (एएससीआय) चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच, एमआरयूसी आणि इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन (आयबीएफ) चे ते संस्थापक सदस्य, आयबीएफ, इंटरनॅशनल न्यूज मीडिया असोसिएशन (आयएनएमए), ब्रॉडकास्ट आॅडियन्स रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) या मानाच्या संघटनांच्या कार्यकारी मंडळांवर त्यांचा समावेश आहे. त्यांनी इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस)च्या कार्यकारी मंडळावरही बराच काळ काम पाहिले. तर एबीसीच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले मुखर्जी हे कोका-कोला इंडिया प्रा. लि.च्या मार्केटिंग आणि व्यापार विभागाचे उपाध्यक्ष आहेत. प्रकाशकांचे प्रतिनिधी विभागात लोकमत मीडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांची एबीसीच्या व्यवस्थापन मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली आहे. या विभागात निवड झालेल्या इतर सदस्यांमध्ये यशोदया एंटरप्रायझेस प्रा. लि.चे आय. व्यंकट, जागरण प्रकाशन लि. चे शैलेश गुप्ता, द बॉम्बे समाचार प्रा. लि.चे होर्मुसजी एन. कामा, एचटी मीडिया लि.चे बेनॉय रॉयचौधरी, एबीपी प्रा. लि.चे चंदन मुजुमदार, बेनेट कोलमन अँड कं.लि.चे राजकुमार जैन, सकाळ पेपर्स प्रा. लि.चे प्रताप जी. पवार यांचाही समावेश आहे. जाहिरात प्रतिनिधी विभागात कोका-कोला इंडिया प्रा. लि.चे देबब्रत मुखर्जी, आयटीसी लि.चे हेमंत मलिक, फ्युचर रिटेल लि.चे संदीप तरकस, टाटा मोटर्स लि.चे मयांक पारिख यांचा समावेश आहे. जाहिरात एजन्सींचे प्रतिनिधी विभागात डीडीबी मुद्रा प्रा. लि.चे मधुकर कामथ, आयपीजी मीडिया ब्रॅण्ड्स इंडियाचे शशिधर सिन्हा, आरके स्वामी बीबीडीओ प्रा. लि.चे श्रीनिवासन के. स्वामी, ग्रुप ए मीडिया इंडिया प्रा. लि.चे सीव्हीएल श्रीनिवास यांचा समावेश आहे. तर महासचिव म्हणून होर्मुझद मसानी यांची निवड झाली आहे.