शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त वक्तव्यामुळे आबा अडचणीत

By admin | Updated: October 12, 2014 03:11 IST

निवडणूक अंतिम टप्प्यात असताना एका वादग्रस्त वक्तव्यामुळे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील शनिवारी चांगलेच अडचणीत आले.

नवा वाद : जाहीर सभेत जीभ घसरली
सांगली : निवडणूक अंतिम टप्प्यात असताना एका वादग्रस्त वक्तव्यामुळे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील शनिवारी चांगलेच अडचणीत आले. बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या मनसेच्या उमेदवाराला आमदार व्हायचे होते, तर किमान निवडणुकीनंतर तरी बलात्कार करायचा, असे वक्तव्य पाटील यांनी जाहीर सभेत केल्याची चित्रफीत खासदार संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत दाखवली. माजी गृहमंत्र्यांनी महिलांचा अवमान केला असून, त्यांच्या सोज्वळतेचा बुरखा फाटला आहे, अशी टीकाही खा. पाटील यांनी केली. 
कवठेएकंद (ता. तासगाव) येथे शुक्रवारी रात्री प्रचार सभत बोलताना  आर. आर. पाटील म्हणतात की, ‘आज मनसेचे कार्यकर्ते मला भेटण्यास आले आणि म्हणाले की आमचा पाठिंबा तुम्हाला. मी का म्हणून विचारले, तर ते म्हणाले, आमचा उमेदवार तुरुंगात आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद झालाय. आता तो राहायला मिरजेत. त्याला आपल्या तालुक्याचा आमदार व्हायचे आहे, तर किमान बलात्कार निवडणुकीनंतर तरी करायचा!’ या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे खा. संजय पाटील यांनी सांगितले. 
 
उपरोधिक टीका
प्रचारसभेत आपण मनसेच्या उमेदवाराबाबत केलेली टीका उपरोधिक होती. या उमेदवारावर आतार्पयत बेकायदा शस्त्र बाळगणो, विनयभंग व बलात्काराचा गुन्हा नोंद आहे. आता हा दुसरा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. महिलांचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. यातून कोणी वेगळे अर्थ काढत असेल, तर मी खेद व्यक्त करतो. 
-आर. आर. पाटील, माजी गृहमंत्री
 
आर. आर. पाटील यांचे वक्तव्य महिलांचा अवमान करणारे आहे. तासगाव तालुक्यात महिलांवर अनेक अत्याचार झाले आहेत. त्यात काही प्रकरणो पोलीस ठाण्यार्पयत जाऊ शकली नाहीत, तर काही प्रकरणांचा तपास योग्यरीत्या झालेला नाही. राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली जाईल. 
- संजयकाका पाटील, खासदार