शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागात बेबंद खरेदी; कोट्यवधींची औषधे वाया

By admin | Updated: April 6, 2016 05:24 IST

नियम आणि निकष डावलून सार्वजनिक आरोग्य विभागाने कोट्यवधी रुपयांच्या औषधांची मनमानीपणे खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, यापैकी महागडी औषधे वापराविना वाया गेली असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

अतुल कुलकर्णी ,  मुंबई नियम आणि निकष डावलून सार्वजनिक आरोग्य विभागाने कोट्यवधी रुपयांच्या औषधांची मनमानीपणे खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, यापैकी महागडी औषधे वापराविना वाया गेली असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक नसतानाही औषधांची खरेदी केली जात असल्याने ही औषधे शिल्लक राहिली आहेत. रत्नागिरीच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी ऐन्टीडी नावाच्या इंजेक्शनच्या ४८०० व्हॉयल मागवल्या. प्रत्यक्षात ३१०६ इंजेक्शन मुदत संपलेले (एक्सपायरी डेट उलटलेले) असल्याने ते सर्व वाया गेले. एका इंजेक्शनची किंमत सुमारे २ हजार रुपये आहे. हाच प्रकार यवतमाळ (११७३), वर्धा (३८२) येथे घडला व हजारो इंजेक्शन्स वाया गेली. आता या प्रकारावर पांघरूण घालण्याची धडपड सुरू झाली आहे. ‘स्ट्रेप्टोकायानेझ १५ लाख’ या एका इंजेक्शनची किंमत जवळपास १ हजार रुपये आहे. या इंजेक्शनचा साठाही अनेक जिल्ह्यांत असाच विनावापर पडून राहिला आणि वाया गेला. उस्मानाबाद जिल्ह्यात असे ८६ इंजेक्शन्स वाया गेले. हाच प्रकार सर्जिकल साहित्याच्या डिस्पोजेल सिरिंज, निडल्सच्या बाबतीतही झाला. भंडारा, पवनी, लाखनांदूर, मोहाडी, लाखनी, तुमसर, साकोळी, शिओरा आदी ठिकाणी मिळून असे १,६७,३४९ इंजेक्शन्स वाया गेल्याचे त्या त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी कळवले आहे.या सगळ्यात धक्कादायक प्रकार वाशिम जिल्ह्यात घडला. तेथील शल्य चिकित्सकाकडून पॅरॉसिटेमॉल सिरपच्या १० हजार ८७० बाटल्या अप्रमाणित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही माहिती एफडीएकडे देणे आवश्यक असताना वाशिमच्या जिल्हा शल्य चिकित्सकाने परस्परच ही माहिती मॅकब्रो हेल्थ केअर प्रा. लि. या मध्य प्रदेशातील कंपनीला कळवली आणि त्यांच्याकडून १० हजार ८७० बाटल्या बदलूनही घेतल्या. मात्र ‘आपण आपला जुना साठा परत नेला नाही आणि जर का अन्न व औषध प्रशासनाने या रुग्णालयास भेट दिली तर हा साठा जप्त होऊ शकतो, त्यामुळे आपण आपला साठा तातडीने घेऊन जा’ असे कळवून टाकले आहे.वास्तविक, असा अप्रमाणित औषधांचा साठा सापडला तर त्याची माहिती एफडीएला दिली पाहिजे, त्यांनी तो साठा जप्त केला पाहिजे. मात्र, या प्रकरणात तुम्ही तुमचा साठा घेऊन जा, कुठेही विका आणि त्यातून कोणाला काही झाले तर तेही तुमचे तुम्ही पाहून घ्या, अशी भूमिका घेणे हे किती जीवघेणे ठरू शकते, हे कळत असतानाही असा पत्रव्यवहार झाला असल्याचे समजते.