शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीत 'आप' अलिप्त

By admin | Updated: October 13, 2014 13:30 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठी हवा करणारी आम आदमी पार्टी राज्यात विधानसभा निवडणुकीत मात्र, गायब झालेली दिसत आहे.

अहमदनगर : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठी हवा करणारी आम आदमी पार्टी राज्यात विधानसभा निवडणुकीत मात्र, गायब झालेली दिसत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढविणार नाही असे आधीच पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने स्पष्ट केले होते. विधानसभा निवडणुकीत पक्षाने कोणत्याही पक्षाला अथवा उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे कार्यकर्ते व मतदारांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. असे प्रसिध्दीपत्रक आप चे जिल्हा संयोजक किरण उपकारे यांनी प्रसिध्दीस दिले आहे. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला जो योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करावे, असेही सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने देशासह राज्यात अनेक मतदारसंघात उमेदवार उभे करून मोठी हवा निर्माण केली होती. पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही विविध मोहिमा हाती घेवून चांगली वातावरण निर्मिती केली होती. लोकसभा निवडणुकीत मात्र, या पक्षाच्या उमेदवार दीपाली सय्यद यांना स्वत:ची अनामत रक्कमही वाचविता आली नाही. राज्यातील बहुतांश मतदारसंघात पक्षाच्या अनेक उमेदवारांची अशीच स्थिती राहिली. त्यामुळे लोकसभेपासून हा पक्ष अडगळीत गेला. विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आप जोमाने कामाला सुरुवात करेल अशी 'आम आदमी'ची अपेक्षा होती. पक्षाने मात्र, अलिप्त राहण्याचाच निर्णय घेतला. मध्यंतरी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना आप चा पाठिंबा मिळणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, कुणालाच पाठिंबा न देण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानेच जाहीर केल्याने स्थानिक कार्यकर्त्यांवरही शांत बसण्याची वेळ आली आहे. आता या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सद्सद् विवेकबुध्दी जागृत ठेवून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.