शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गृहखरेदीसाठीही लवकरच आधार कार्डची सक्ती

By admin | Updated: November 5, 2014 04:39 IST

आजवर केवळ सरकारी अनुदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘आधार’ कार्डची व्याप्ती वाढविण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली असून लवकरच गृहखरेदीसाठी ‘आधार’ क्रमांक देणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

मनोज गडनीस, मुंबईआजवर केवळ सरकारी अनुदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘आधार’ कार्डची व्याप्ती वाढविण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली असून लवकरच गृहखरेदीसाठी ‘आधार’ क्रमांक देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. गृहखरेदीवेळी नोंदणी करताना ग्राहक व संबंधित विकासक दोघांनाही त्या अ‍ॅग्रीमेंटमध्ये आपापला ‘आधार’ क्रमांक नमूद करावा लागणार आहे. या प्रक्रियेमुळे कुणाच्या नावे किती घरे, जमीन अथवा अचल मालमत्ता आहे, याचा तपशील सरकारला समजतानाच या व्यवहारांत ‘ब्लॅक’च्या व्यवहारालाही चाप बसणार आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी देशभरातील प्राप्तिकर विभागांच्या उच्चाधिकाऱ्यांची बैठक घेताना देशांतर्गत ‘काळ््या’ पैशांच्या व्यवहारांविरोधातही कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीला उपस्थित असलेल्या प्राप्तिकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत काळ््या पैशांचा माग काढण्यासाठी विविध ज्या उपायोजना योजल्या जाणार आहेत, त्यापैकीच एक म्हणजे ‘आधार’ कार्डाच्या प्रणालाची वापर करण्याचा विचार पुढे आला आहे. ‘आधार’ कार्डामध्ये केवळ संबंधित व्यक्तीची वैयक्तिक माहितीच साठविलेली नाही, तर त्याचसोबत बँक किंवा विविध आर्थिक विभागांत हा क्रमांक पाठविण्यात आलेला आहे. त्यामुळे केंद्रीय सर्व्हरवर संबंधित व्यक्तीचा ‘आधार’ क्रमांक टाकला की त्याची सर्व कुंडली समोर येते.