शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

९८ महापौर, आयुक्तांना निमंत्रण

By admin | Updated: June 20, 2016 01:32 IST

देशभरातून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निवड झालेल्या ९८ शहरांच्या महापौर व आयुक्तांना शनिवारी (दि. २५) होत असलेल्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे

पुणे : देशभरातून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निवड झालेल्या ९८ शहरांच्या महापौर व आयुक्तांना शनिवारी (दि. २५) होत असलेल्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मार्ट सिटीच्या विविध कार्यक्रमांचा शुभारंभ बालेवाडी येथील सभागृहामध्ये केला जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा मोदी यांच्याकडून या कार्यक्रमामध्ये केल्या जाण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी खूपच कमी वेळ मिळाल्याने युद्धपातळीवर कामे सुरू आहेत.स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीच्या विविध कामांसाठी १ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च झाला असून त्यापैकी सर्वाधिक खर्च १ कोटी ८३ लाख रुपयांचा खर्च होर्डिंग, रेडिओ व वृत्तपत्रांमधील जाहिरातींवर झाला आहे. कंपनीच्या आतापर्यंत झालेल्या खर्चाचा हा तपशील मंगळवारी (दि. २१) होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मांडला जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन या स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली. स्मार्ट सिटी योजनेसाठी केंद्राकडून २८३ कोटी रुपयांचा निधी कंपनीला प्राप्त झाला आहे.(प्रतिनिधी)पुणे ठरणार स्मार्ट सिटीचे रोल मॉडेलस्मार्ट सिटीसाठी निवडण्यात आलेल्या ९८ शहरांमधून पहिल्या टप्प्यात २० शहरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहराने दुसरा क्रमांक पटकाविला. योजनेमध्ये नागरिकांचा सर्वाधिक सहभाग मिळविण्याचा मानही पुण्याने पटकाविला आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या घोषणेची वर्षपूर्ती येत्या २५ जून रोजी होणार आहे. यानिमित्त योजनेतील महत्त्वपूर्ण कामांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेचे रोल मॉडेल म्हणून पुण्याकडे पाहिले जाणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीचा आतापर्यंत सर्वाधिक खर्च हा जाहिरातींवर झाला आहे. त्यामध्ये वृत्तपत्रांमधील जाहिरातींसाठी १ कोटी ७३ लाख ५६ हजार रुपये, रेडिओ जाहिरातींसाठी ४ लाख ७९ हजार रुपये, होर्डिंगसाठी ५ लाख २० हजार रुपये खर्च झाला आहे. स्मार्ट सिटीच्या बैठकांच्या चहापानासाठी ३ हजार ९६८ रुपये खर्ची पडले आहेत. विविध प्रकारच्या स्टेशनरी खरेदीसाठी ४४ हजार ४०० रुपयांचा खर्च झाला. स्मार्ट सिटी अभियानासाठी आयोजित आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या रोड शोसाठी १ लाख २३ हजार ५०० रुपयांचा खर्च झाला आहे. सौरऊर्जा या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यासाठी ४ हजार ८५३ रुपयांचा खर्च झाला आहे.