शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

९८ लाखांच्या जुन्या नोटा जप्त; भोईवाड्यात एकाला अटक

By admin | Updated: April 1, 2017 04:15 IST

साकीनाका, घाटकोपरपाठोपाठ भोईवाड्यात १० टक्के कमिशनवर पैसे बदलण्यासाठी आलेल्या शशिकांत तुकाराम कांबळे

मुंबई : साकीनाका, घाटकोपरपाठोपाठ भोईवाड्यात १० टक्के कमिशनवर पैसे बदलण्यासाठी आलेल्या शशिकांत तुकाराम कांबळे याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल ९८ लाख ७५ हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या तीन दिवसांतील ही तिसरी कारवाई आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी एक तरुण पैसे बदली करण्यासाठी भोईवाडा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी धनंजय लिगाडे, सहायक पोलीस निरीक्षक मुकेश ढगे आणि गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सापळा रचला. रात्री पावणे नऊच्या सुमारास एका टोयोटा गाडीतून आलेल्या कांबळेला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत तब्बल ९८ लाख ७५ हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ही गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही गाडी त्याच्या भावाच्या मालकीची असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.कांबळे हा घाटकोपरचा रहिवासी आहे. त्याचा यापूर्वी दुचाकी विकण्याचा व्यवसाय होता. सध्या तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. विविध ठिकाणांतील पाच ते सहा मित्रांनी त्यांच्याकडील पैसे बदली करण्याचे काम एकाला दिले. त्या व्यक्तीने कांबळेशी संपर्क साधला. हे पैसे बदली करून आणून देण्यासाठी १० टक्के कमिशनचे आमिष दाखविले होते. त्यामुळे कांबळेने तयारी दाखविली आणि भावाच्या गाडीतून तो भोईवाड्यात पोहोचला. मात्र लिगाडे यांच्या पथकाने त्याला वेळीच बेड्या ठोकल्या.दिंडोशीत ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्तखेरवाडीनंतर आता दिंडोशी परिसरात हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. या नोटा जवळपास ५० लाख रुपयांच्या असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असुन अन्य दोघे फरार आहेत. हितेश देढिया असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. (प्रतिनिधी)