शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

विमानांच्या लँडिंगद्वारे ९.६५ कोटींची वसुली

By admin | Updated: May 9, 2014 23:51 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाच्या लँडिंगद्वारे १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या काळात मिहान इंडिया लिमिटेडला ९.६५ कोटी प्राप्त झाले.

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाच्या लँडिंगद्वारे १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या काळात मिहान इंडिया लिमिटेडला ९.६५ कोटी प्राप्त झाले. याशिवाय पार्किंगद्वारे ८.६५ लाख, पीएसएफद्वारे १३.५८ कोटी आणि जाहिरातीच्या अधिकाराद्वारे १.०८ कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय निवडणुकीच्या काळात विमानतळावर मार्च आणि एप्रिलमध्ये खासगी विमान आणि हेलिकॉप्टरची बरीच ये-जा होती. त्याद्वारे मार्चमध्ये लँडिंगसाठी ६.३७ लाख आणि एप्रिलमध्ये ३.१७ लाख, शिवाय मार्चमध्ये पार्किंग शुल्क ७९.५४ हजार आणि एप्रिलमध्ये १०.८४ हजार, तसेच पीएसएफच्या स्वरूपात मार्च व एप्रिलमध्ये अनुक्रमे २५.४६ हजार व ३०.०१ हजार मिळाले. उपरोक्त माहिती अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारांतर्गत मिहान इंडिया लिमिटेडने दिली आहे. वर्षभरात ११२ हेलिकॉप्टर आणि अन्यच्या ९२ हालचाली झाल्याची विमानतळावर नोंद आहे. शिवाय काँटिनेन्टल एव्हिएशन प्रा.लि.चे विमान विमानतळावर २१ जुलै १९९१ पासून उभे आहे. पार्किंगचे भाडे म्हणून कंपनीकडून किती वसूल केले, या प्रश्नाच्या उत्तरात मिहान इंडियाने सांगितले की, विमानतळ मिहान इंडिया लिमिटेडकडे हस्तांतरित झाल्यापासून १ एप्रिल २००९ ते ३१ आॅक्टोबर २०१३ या काळात १.०५ कोटी रुपये कंपनीकडे बाकी आहे. याशिवाय विमानतळावर येणार्‍या दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा ठेका खासगी कंपनीला प्रति माह ५.६९ लाख रुपयांत दिल्याचे कंपनीने सांगितले. माहितीच्या अधिकारात एएआय आणि मिहान इंडिया या कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचार्‍यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मिहान इंडियामध्ये कार्यरत एएआयच्या कर्मचार्‍यांनी मिहान इंडियाकडून पगार घेण्यास नकार दिला आहे. या कर्मचार्‍यांना एएआय पगार देत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. (प्रतिनिधी)

वर्षभरात किती प्राणी आणि पक्ष्यांमुळे धावपट्टीवर अडथळा निर्माण झाला, त्यांच्यामुळे किती अपघात झाले आणि किती प्राणी व पक्षी मरण पावले, या प्रश्नाचे उत्तर कोलारकर यांना खरोखरंच अपेक्षित उत्तर मिळाले आहे.

वर्षभरात पक्षी व प्राण्यामुळे अडथळा निर्माण झालेला नाही, शिवाय पक्षी व प्राणी मरण पावले नाही, तसेच विमानाला एकही पक्षी धडकला नाही, असे उत्तर मिळाले. कोलारकर यांनी ही माहिती आयटीआय २००५ कायद्यांतर्गत कंपनीला मागितली होती.