शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला मिळाले ९.३0 कोटी!

By admin | Updated: February 16, 2016 01:04 IST

रब्बी पीक विमा रकमेत अमरावती विभागाचा वाटा ३.९९ टक्के तर विभागात अकोला जिल्हा आघाडीवर.

राजरत्न सिरसाट/अकोला: राष्ट्रीय पीक विमा योजना शेतकर्‍यांसाठी कवचकुंडलाची भूमिका बजावत असून, मागील १६ वर्षांत रब्बी पीक विम्याची ९३0 कोटी ७३ लाख १८ हजार रुपये नुकसान भरपाई राज्यातील शेतकर्‍यांना मिळाली असून,अमरावती विभागाचा यात ३.९९ टक्के वाटा आहे. या विभागात अकोला जिल्हा आघाडीवर आहे. पावसाची अनिश्‍चितता,नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांचे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सन १९९९ मध्ये सर्वप्रथम रब्बी पिकासाठी पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यानंतर २000 साली खरीप पीक विमा योजना सुरू करण्यात आली. या पीक विमा योजनेंतर्गत शेतकर्‍यांना पिकाचा विमा काढावा लागतो. मागील १६ वर्षात राज्यात २४ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचा विमा काढण्यात आला होता. याकरिता २१४ कोटी ५५ लाख ६७ हजार विमा हप्ता शेतकर्‍यांनी भरला होता. या विमा हप्त्यापोटी राज्यातील २९ लाख ८८ हजार शेतकर्‍यांना ९३0 कोटी ७३ लाख १८ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. या रब्बी विमा योजनेचा लाभ विदर्भातील १८ लाख ५८ हजार शेतकर्‍यांना झाला आहे. ११ लाख ६३ हजार हेक्टरचा विमा शेतकर्‍यांनी काढला होता.अमरावती विभागातील शेतकर्‍यांनी १२ कोटी ६८ लाख ८२ हजार रुपये विमा हप्ता भरला होता. या विभागाला ३७ कोटी ११ लाख ३0 हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे.अकोला जिल्हा आघाडीवरनैसर्गिक आपत्ती बघता अकोला जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेवर भर दिला असून,रब्बी पीक विमा योजना सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत या जिल्हय़ातील एक लाख ३७ हजार शेतकर्‍यांनी ९ कोटी ४९ लाख २५ हजार रुपये रब्बी पीक विमा हप्ता भरला होता, या शेतकर्‍यांना १९९९ ते २0१५ पर्यंत २५ कोटी ५४ लाख ५५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. ही टक्केवारी २.७५ म्हणजे अमरावती विभागातील पाच जिल्हय़ात सर्वाधिक आहे.