शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी शाळेतील ९0 विद्यार्थी बेपत्ता!

By admin | Updated: November 16, 2016 02:38 IST

धक्कादायक परिस्थिती; पालकांनीही सोडले गाव.

गणेश मापारीखामगाव, दि. १५- पाळा येथील आदिवासी प्राथमिक निवासी शाळेमधील तब्बल ९0 विद्यार्थ्यांनी पालकांसह गाव सोडल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. विद्यार्थीनीच्या अत्याचार प्रकरणानंतर शाळेची मान्यता रद्द करण्यात आल्याने, या शाळेमधील विद्यार्थ्यांचे दुसर्‍या शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला असता, ही बाब उजेडात आली.खामगाव तालुक्यातील पाळा येथील आदिवासी विकास विभागाच्या निवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थीनींवर अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात १७ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, आदिवासी आयुक्तांनी सदर शाळेची मान्यता रद्द केल्यामुळे या शाळेतील ३८८ विद्यार्थ्यांंचे समायोजन करण्याची प्रक्रिया आदिवासी विभागाकडून सुरू आहे. पाळा येथील आश्रमशाळेमध्ये अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा आणि जळगाव या पाच जिल्ह्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दिवाळीच्या सुटीनिमित्त सर्व विद्यार्थी आपल्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे आदिवासी विभागाची विविध पथके विद्यार्थ्यांंच्या मूळ गावात जावून त्यांच्या पालकांकडून समायोजन करण्याच्या शाळेबाबत लेखी संमती घेत आहेत; मात्र एकूण ३८८ विद्यार्थ्यांंपैकी ९0 विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी पथकाला आढळून आले नाहीत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांंचे पालकसुद्धा गाव सोडून गेले आहेत. विद्यार्थी आणि पालक मध्य प्रदेशात!आदिवासी विभागाच्या पथकाला काही विद्यार्थी व त्यांचे पालक मध्य प्रदेशात गेल्याची माहिती मिळाली आहे. शाळेतील नोंदणीनुसार विद्यार्थ्यांंच्या गावाचा शोध घेण्यात आला आहे. संबधीत गावातील सरपंचांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी गाव सोडल्याबाबत या पथकाला लेखी माहिती देखील दिली आहे. बनावट प्रवेश की आरोपींची भीती?आदिवासी आश्रमशाळेतील ९0 विद्यार्थी पालकांसह मूळ गावातून गायब होण्याबाबत दोन शक्यता वर्तविण्यात येत आहेत. या प्रकरणातील आरोपींच्या भीतीपोटी पालकांनी गाव सोडले, अशी चर्चा काही गावांमध्ये आहे, तर आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांंकडून प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन विद्यार्थ्यांंचा शाळेमध्ये बनावट प्रवेश दाखविला असेल, प्रत्यक्षात विद्यार्थी शाळेत येतच नसतील, ही वस्तुस्थितीही समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.पाळा येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांंचे वेगवेगळ्या शाळांमध्ये समायोजन करण्याकरीता सदर विद्यार्थ्यांंच्या मूळगावी पथक पाठविण्यात आले. अनेक गावांमध्ये विद्यार्थी आणि पालक आढळून आले नाहीत. त्यामुळे सरपंचांकडून लेखी माहिती घेण्यात आली आहे. -व्ही.ए.सोनवणे, आदिवासी प्रकल्प अधिकारी, अकोला.