शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

चोवीस तासांत स्वाइन फ्लूचे ९ बळी

By admin | Updated: March 5, 2015 01:28 IST

राज्यातील स्वाइन फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत या आजाराने ९ जिल्ह्यांत ९ जणांचा बळी घेतला.

पुणे : राज्यातील स्वाइन फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत या आजाराने ९ जिल्ह्यांत ९ जणांचा बळी घेतला. यामुळे या वर्षातील बळींची संख्या १७०वर पोहोचली आहे. मंगळवारी दिवसभरात स्वाइन फ्लूची लागण झालेले १०६ नवे रुग्ण सापडले. ४१ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.राज्यभरातील २० हजार नागरिकांची मंगळवारी स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २ हजार संशयितांना टॅमीफ्लू औषधे देण्यात आली. त्यातील १०६ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लागण झालेल्यांची संख्या २ हजार ५ वर पोहोचली आहे. यापैकी ९ जणांचा मंगळवारी मृत्यू झाला. यामध्ये नागपूर शहर व जिल्हा, पुणे, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, मुंबई, कोल्हापूर आणि धुळे या जिल्ह्यांमधील प्रत्येकी एकाचा स्वाइन फ्लूमुळे बळी गेला. दरम्यान उद्या होळी असल्याने स्वाइन फ्लूची भिती व्यक्त होत आहे.स्वाइन फ्लूचा लेखाजोखाच्१ जानेवारीपासून आतापर्यंत १ लाख ८५ हजार १२३ जणांची तपासणीच्१९ हजार ७०७ जणांना टॅमीफ्लू औषधे दिलीच्२ हजार ५ जणांना लागणच्१७० जणांचा मृत्यूच्इतर राज्यातील १५ जणांचा महाराष्ट्रात मृत्यूच्१ हजार ४२५ जणांवर यशस्वी उपचारकेंद्राकडून राज्याला ३ हजार त्रिगुणा लसीस्वाइन फ्लू रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना आजाराची लागण होऊ नये, म्हणून त्यांना प्रतिबंधक त्रिगुणा लस देण्यात येणार आहे. यासाठी केंद्रशासनाने बुधवारी राज्याला ३ हजार त्रिगुणा लसीचा पुरवठा केला. राज्यात पहिल्यांदाच उपलब्ध झालेली ही लस रुग्णालयांच्या आयासोलेशन वॉर्डमधील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. राज्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र (आयसोलेशन) वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. स्वाइन फ्लू संसर्गजन्य असल्याने या वॉर्डमधील कर्मचाऱ्यांना त्याची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्यशासनाच्या आरोग्य विभागातर्फे केंद्राकडे १२ हजार लसींची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ३ हजार लसी केंद्राने राज्याकडे पाठवून दिल्या आहेत. त्रिगुणा लस एच १ एन १ या विषाणूंसह आणखी दोन आजारांच्या विषाणूंनाही रोखणारी आहे. ही लस शासकीय रुग्णालयांमध्ये आयासोलेशन वॉर्डमध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारिकांना देण्यात येणार आहे. रुग्णांसाठी घरोघरी शोधमोहीमसचिन राऊत ल्ल अकोला‘स्वाइन फ्लू’च्या वाढत्या प्रभावाने राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा हादरली असून आजाराचे संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने सोमवारी राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले.राज्यातील ८ ते ९ जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’ चा उद्रेक झाला असून, नागपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ पुणे, पुणे ग्रामीण, नाशिक, सोलापूर, नांदेड, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, लातूर,अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात रुग्ण आढळले आहेत. २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान झालेला अवकाळी पाऊस व गारपीट ‘स्वाइन फ्लू’च्या उद्रेकाला दुर्दैवाने आणखी पोषक ठरला. आजाराचा वाढता धोका लक्षात घेता प्रत्येक शहर व ग्रामीण भागात घरोघरी शोधमोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांवर औषधोपचारही करण्यात येतील. जिल्हा मृत्यूनागपूर ४६पुणे-पिंपरी ३६मुंबई ०३ठाणे ०७लातूर ०८नाशिक ०८अमरावती ०२अकोला ०२(२८ फेब्रुवारी २०१५ पर्यंतचे बळी)