शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूचे ९ बळी, १३५ जणांना लागण

By admin | Updated: June 28, 2017 03:22 IST

कधी उकाडा तर कधी गारवा अशाप्रकारे वातावरण सतत बदलत असल्याने मागील तेरा दिवसात ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूने पाच

पंकज रोडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कधी उकाडा तर कधी गारवा अशाप्रकारे वातावरण सतत बदलत असल्याने मागील तेरा दिवसात ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूने पाच जण दगावले असून तब्बल ८४ रुग्ण वाढले आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यात नऊ जण दगावले असून त्यातील सहा रुग्ण ठाणे पालिकेच्या हद्दीतील आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीला १३५ जणांना स्वाइनची लागण झाली असून त्यातील १०६ रुग्ण ठाणे शहरातील आहेत. ठाण्यातील स्वाइनचे रुग्ण हे प्रामुख्याने उच्चभ्रू वस्तीतील आहेत. याचदरम्यान, गेल्या सहा महिन्यात जिल्हाभरातून स्वाइन फ्लूच्या संशयित ९२ हजार ७१० रुग्णांची तपासणी केली आहे. यातील १० हजार ६९ रुग्णांची गत १३ दिवसात तपासणी करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा हा ग्रामीण आणि शहरी असा असून या जिल्ह्यात एकूण सहा महापालिका आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठी विशेष कक्ष स्थापन केलेले आहेत. तर त्या-त्या रुग्णालयात स्कॅनिंग सेंटर उभारलेले आहेत. याचदरम्यान, १ जानेवारी ते २४ जूनदरम्यान या आजारासंदर्भात एकूण ९२ हजार ७१० जणांची तपासणी केलेली आहे. त्यामध्ये १६० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १३५ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील ६५ जण अजूनही उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ठाण्यात- ६, मीरा-भार्इंदर -२, आणि कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील एकाचा समावेश आहे.ठाणे जिल्ह्यातील सहा पैकी चार महापालिकेत स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. या काळात उल्हासनगर आणि भिवंडी या दोन्ही महापालिकेच्या हद्दीत अद्याप एकही स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळलेला नाही. उल्हासनगरात एक संशयित पुढे आला होता. पण, त्याला स्वाइन फ्लू झाला नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. तर नवी मुंबईत आतापर्यंत ३ संशयित आढळले असून त्यातील दोघाना घरी सोडण्यात आले असून एकावर उपचार सुरू आहेत.