शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून ९ ठार, १३ जखमी

By admin | Updated: September 15, 2014 00:58 IST

चंद्रपूर जिल्ह्यात पाच, अमरावतीत दोन व गडचिरोली जिल्ह्यात दोन बळी चंद्रपूर/गडचिरोली/अमरावती : रविवारी वीज पडल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पाच, अमरावती

एका बैलाचाही मृत्यू : चंद्रपूर जिल्ह्यात पाच, अमरावतीत दोन व गडचिरोली जिल्ह्यात दोन बळी चंद्रपूर/गडचिरोली/अमरावती : रविवारी वीज पडल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पाच, अमरावती जिल्ह्यात दोन आणि गडचिरोली जिल्ह्यात दोन असे सहा नागरिक जागीच ठार झाले तर नऊ जण जखमी झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात धाबापासून काही अंतरावर असलेल्या वामनपल्ली शेतशिवारात लैलाबाई रावजी गेडाम (४०), गौतम मानकर (३२), गीताबाई चंद्रकांत येवले (४५) रा. विसापूर व चिमूर तालुक्यातील मसली गावाजवळील शेतशिवारात इंद्रजित नन्नावरे (३५) आणि शनिवारी सायंकाळी ब्रह्मपुरी तालुक्यात कुडेसावली येथील रमेश विठोबा गुरुनुले (४०) तसेच गडचिरोली जिल्ह्यातील जिमलगट्टा येथून दोन किमी अंतरावर असलेल्या रसपल्ली गावाजवळ रविवारी ४ वाजताच्या सुमारास विजय बापू कोठारी (३०) रा. मालागुड्डम, नीलेश तुळशिराम जरपला (१३) रा. रसपल्ली आणि अमरावती जिल्ह्यात प्रवीण गुलाबराव इंगळे (३५) व अर्चना प्रवीण इंगळे (३० दोन्ही रा.खेडपिंप्री) या पती-पत्नीचा मृत्यू झाला. जखमींमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात मसलीजवळचे दिलीप सोयाम, सावरगावजवळचे राजू जीवतोडे, संजय जीवतोडे, तळोधी नाईकचे कमलाकर सोनवणे आणि गडचिरोली जिल्ह्यात शंकर मलय्या गोमासे (३४) रा. रसपल्ली, मन्तेश पोचा दुर्गे (२८) रा. मालागुड्डम, मधुकर राजा दुर्गे (४५) रा. मालागुड्डम, भीमा पेंटा कुळमेथे (४०) रा. येदरंगा, नितीन महेंद्र जनगम (१०) रा. मालागुड्डम, राजू रामू बानेत (५०) रा. रसपल्ली, नरेंद्र बालाजी जनगम (२८) रा. मालागुड्डम, बंगो बंडे गावळे (५५) रा. येदरंगा, मोहन मधुकर अजमेर (३०) रा. रसपल्ली यांचा समावेश आहे.गोंडपिपरी तालुक्यात धाबापासून काही अंतरावर वामनपल्ली शेतशिवारात लैलाबाई गेडाम काम करीत होती. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आल्याने ती शेताच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरील आंब्याच्या झाडाखाली आली. दरम्यान, गौतम मानकर व पटवारी ए.डी. चौधरी हे तिथूनच दुचाकीने जात होते. पावसामुळे तेही त्याच रस्त्यावर दुसऱ्या झाडाखाली थांबले. मात्र गौतम मानकर हे लैलाबाई थांबून असलेल्या आंब्याच्या झाडाखाली गेले. तिथेच वीज कोसळली. यात गौतम मानकर व लैलाबाई गेडाम या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पटवारी चौधरी दुसऱ्या झाडाखाली असल्याने बचावले. झोपडीतच पती-पत्नीचा मृत्यू अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खेडपिंप्री येथे प्रवीण गुलाबराव इंगळे (३५) व अर्चना प्रवीण इंगळे (३०) पती-पत्नी शेतात फवारणीचे काम सुरु असल्याने शेतात गेले होते. परंतु दुपारी ४.३० वाजतापासून अचानक विजांचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हे दाम्पत्य शेतातीलच झोपडीत शिरले आणि याचवेळी झोपडीवर वीज कोसळल्याने दोघांचाही भाजल्याने मृत्यू झाला. वीज पडल्याने शेतातील झोपडीही बेचिराख झाली.