शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही बाधित रुग्णांना प्रवास सवलत दिल्यास ९ कोटींचा बोजा

By admin | Updated: July 9, 2016 00:06 IST

आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण; मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याचा प्रयत्न.

अकोला: शासनाने विविध सामाजिक घटकांना व रुग्णांनाही राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास सवलत दिली आहे. यामध्ये एचआयव्ही बाधित रुग्णांचा समावेश करावा, अशी मागणी अनेक वर्षांंपासून सुरू असून या मागणीबाबत बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्याच्या चर्चेत हा मुद्दा लावून धरला होता. त्याची दखल घेत आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ही मागणी पूर्ण केल्यास राज्य परिवहन महामंडळावर प्रतिवर्षी किमान ९ कोटींचा बोजा पडेल, असे स्पष्टीकरण पत्रात दिले असून या संदर्भात मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यास पुढे कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे. राज्यमध्ये एचआयव्ही बाधितांचा टक्का वाढत असून सन २0२0 पर्यंंत ह्यशून्यह्ण रुग्ण हे उद्दिष्ट ठेवत सध्या आरोग्य विभागाची वाटचाल सुरू आहे. एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी जिल्हास्तरावर एआरटी केंद्रांची स्थापना केली असून त्याद्वारे रुग्णांना औषधोपचार विनामूल्य पुरविला जातो. विविध जिल्ह्यांमधील रुग्ण जिल्ह्याच्या ठिकाणी हे औषध घेण्यासाठी येत असतात; मात्र बरेचदा आर्थिक अडचणीमुळे हे रुग्ण एआरटी केंद्रावर पोहचत नाहीत, परिणामी त्यांच्या उपचारामध्ये खंड पडतो. हे टाळण्यासाठी अशा रुग्णांना राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांमध्ये प्रवास सवलत देण्याची मागणी एचआयव्ही प्रतिबंधक क्षेत्रात काम करणार्‍या अनेक संस्था व कार्यकर्त्यांंनी केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने आमदार सपकाळ यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात या संदर्भात मुद्दा उपस्थित केला असता आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी याबाबत राज्यभरातील रुग्णांची माहिती घेतली. सध्या राज्यात १ लाख ५0 हजार ५३२ रुग्ण एआरटी केंद्रावर उपचारासाठी येतात. या रुग्णांना त्याच्या घरापासून तर केंद्रापर्यंंतची प्रवास सवलत लागू केली तर राज्य परिवहन महामंडळावर ९ कोटी १२ लाख ४८ हजार एवढा अतिरिक्त भार पडणार आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेतल्यावरच याबाबत निर्णय घेता येणे शक्य असल्याचेही डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले आहे.