शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरमध्ये ९७ कुपोषित बालके

By admin | Updated: July 15, 2017 03:17 IST

बालवाड्यांतील मुलांच्या तपासणीत तब्बल ३४ तीव्र व ६३ मध्यम गटातील अशी मिळून ९७ कुपोषित बालके आढळली आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील अंगणवाडी, बालवाड्यांतील मुलांच्या तपासणीत तब्बल ३४ तीव्र व ६३ मध्यम गटातील अशी मिळून ९७ कुपोषित बालके आढळली आहेत. त्यांच्यावर उपचार, मार्गदर्शनासाठी शहरात पोषण पुनर्वसन केंद्रच नसल्याने कुपोषणग्रस्त बालकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. मीरा-भार्इंदरमध्ये शहरी भागातील ४२ व ग्रामीण भागातील ३९ अंगणवाड्या आहेत. तर, महापालिकेच्या बालवाड्यांची संख्या २६ आहे. या अंगण व बालवाड्यांमध्ये ८ हजार ३४३ मुले आहेत. अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना तसेच स्तनदा मातांना एकात्मिक बालविकास प्रकल्प माध्यमातून सकस आहाराचा पुरवठा व्हायला हवा. यात लापशी, खिचडी, पुलाव, चण्याची उसळ, गूळ, कुरमुरा लाडू, भेळेचा समावेश आहे. ही कामे महिला बचत गटांना देण्यात आली आहेत. सकस आहारासाठी सरकारी तिजोरीतून लाखोंचा खर्च दाखवला जातो. प्रत्यक्षात सकस आहार पुरवला जात नसल्याची ओरड सतत होते. गूळ-शेंगदाणा लाडू तर आता बंदच झाला आहे. बालवाड्यांतही निकृष्ट खाऊ पुरवल्याची प्रकरणे यापूर्वीच उघड झाली होती. अंगणवाडी व बालवाड्यांमधील सहा वर्षांपर्यंतच्या मुलांची वर्षातून दोनदा वैद्यकीय तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये मागील दोन महिन्यांत तब्बल ३४ तीव्र कुपोषणग्रस्त, तर ६३ मध्यम कुपोषणग्रस्त बालके आढळली आहेत. त्यांना व त्यांच्या मातांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करणे आवश्यक आहे. परंतु, मीरा-भार्इंदरमध्ये असे केंद्रच नाही. पालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातच दोन कुपोषणग्रस्त बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्याची संकल्पना आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी मांडली होती. परंतु, सहा महिने उलटूनही पालिका केंद्र सुरू करू शकलेली नाही. >केंद्र रखडलेपालिकेने पोषण पुनर्वसन केंद्र तयार केले आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता होताच हे केंद्र सुरू होणार आहे. मीरा-भार्इंदरमधीलच नव्हे तर ठाणे, पालघर जिल्ह्यांतील कुपोषणग्रस्त बालकांना सकस आहारासह मार्गदर्शन व उपचार मिळणार आहे, असे डॉ. अंजली पाटील म्हणाल्या.