मुंबई : राज्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सरासरी ७७ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. जुलै ते सप्टेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम घेण्यात आला. २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध, तर ९४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी सकाळी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील आचारसंहिता संपणार असल्याची माहिती सत्यनारायण यांनी दिली.
९४ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान
By admin | Updated: June 23, 2014 04:13 IST