शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम हटवण्यासाठी ९२ पोलीस नियुक्त

By admin | Updated: April 27, 2017 01:48 IST

नवी मुंबईतील बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने यापूर्वी राज्य सरकारला दिले आहेत.

मुंबई : नवी मुंबईतील बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने यापूर्वी राज्य सरकारला दिले आहेत. त्याचे पालन करत राज्य सरकारने ९२ पोलिसांची नियुक्ती केल्याची माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला दिली. दिघ्यासह उर्वरित नवी मुंबईतील बांधकाम पाडण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार सरकारी वकिलांनी नवी मुंबईतील बांधकाम हटवण्यासाठी १०६ विशेष पोलिसांपैकी ९२ पोलिसांची नियुक्ती केली असून त्यांना प्रशिक्षणासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाला दिली.तसेच नव्या धोरणाबाबत सांगताना सरकारी वकिलांनी एमआरटीपी कायद्यात सुधारणा करून नवी नियमावली करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागेल, अशीही माहिती खंडपीठाला दिली. दिघ्यामधील बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी राजीव मिश्रा व मयूरी मारू यांची उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी जून महिन्यात ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)