शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीला रंगणार ९०वे साहित्य संमेलन

By admin | Updated: September 19, 2016 06:00 IST

आगामी ९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीला होणार आहे.

पुणे : आगामी ९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीला होणार आहे. संमेलनस्थळ निश्चित करण्याबाबत रविवारी साहित्य महामंडळाची पुण्यात बैठक झाली. त्यात आयोजनाचा मान डोंबिवलीच्या आगरी युथ फोरमला मिळाला आहे. याबाबत निर्णय पुण्यात होऊनही अधिकृत घोषणा मात्र साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हेकेखोरपणामुळे २० सप्टेंबरला नागपूरलाच होणार आहे. संमेलनासाठी सातारा, चंद्रपूर, बेळगाव, कल्याण, डोंबिवली, रिद्धपूर येथून निमंत्रणे आली होती. महामंडळाने बेळगावचे सार्वजनिक वाचनालय, डोंबिवलीमधील आगरी युथ फोरम व कल्याणचे सार्वजनिक वाचनालय यांनी सुचविलेल्या स्थळांची पाहणी केली होती. बैठकीत अध्यक्षांसह काही सदस्यांचा बेळगावकडे अधिक कल होता तर काहींची डोंबिवलीला पसंती होती. अखेर डोंबिवलीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कौतिकराव ठाले-पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)>बैठकीचे पुण्यात का आयोजन?साहित्य महामंडळाचे कार्यालय मसापमधून विदर्भ साहित्य संघाकडे गेल्यानंतर संमेलनाच्या स्थळ निश्चितीबाबतची बैठक नागपूरलाच होणे अपेक्षित होते. मात्र ही बैठक पुण्यात आयोजित करण्यामागचे कारण उलगडले नाही. तरीही, बैठक झालेल्या ठिकाणी निर्णय जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र महामंडळाचे अध्यक्ष डॉ. जोशी यांनी शेवटपर्यंत निर्णयासंदर्भात मौन बाळगून नागपूरलाच अधिकृत घोषणा करण्याचा हेका कायम ठेवला. >पुण्यात बैठक घेतली म्हणजे निर्णय येथेच जाहीर करायला पाहिजे, असे काही नाही. संमेलन स्थळ निवडीचा निर्णय २० सप्टेंबरला नागपूर येथे मी जाहीर करणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही.- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, साहित्य महामंडळ