शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

हत्येनंतर ९०० ग्रॅम सोने गेले चोरीला

By admin | Updated: January 1, 2017 20:17 IST

सराफा व्यापारी खून प्रकरणात आता नवीन खळबळजनक घटना पुढे आली.

ऑनलाइन लोकमतआखाडा बाळापूर, दि. 1 - येथील सराफा व्यापारी खून प्रकरणात आता नवीन खळबळजनक घटना पुढे आली. मृत व्यापाऱ्याचा मेहुणा व आखाडा बाळापूर येथील सराफा असोसिएशनच्या शिष्टमंडळाने तपास अधिकाऱ्यांची भेट घेत तब्बल ९०० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती दिली. त्यामुळे या खून प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे. येथील सराफा व्यापारी भोजलिंग प्रताप पाटील यांचा एरिगेशन कॅम्पच्या माळरानावर खून झाला. या खूनप्रकरणी दोघांना अटक केली असून, हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले असताना आठ ते नऊ दिवसांनंतर मयत भोजलिंगचे मेहुणे युवराज परशुराम जाधव व सराफा असोसिएशनचे शिष्टमंडळ दुपारी २ वाजता ठाण्यात येऊन तपासिक अमलदार सापोनि जी. एस. राहिरे यांची भेट घेतली. मेहुणा भोजलिंग याची हत्या झाली. त्या दिवशी दुकानावरून घरी आणून ठेवलेल्या बॅगेत सोन्याचे दागिने असलेला डब्बा चोरीला गेला. त्यात ९०० ग्रॅम सोन्याचे दागिने असल्याची माहिती दिली. एवढे मोठे दागिने चोरी झाल्याची माहिती उशिराने सांगितल्याबद्दल पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले. तुमची काय माहिती असेल ती द्या परंतु पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून, खरा आरोपी शोधून काढणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिष्टमंडळात युवराज जाधव, सुरेश जाधव, मधुकर लोलगे, प्रविण वर्मा, अमोल टाक, बालाजी शहाणे, भैरु वर्मा, ओंकार अमाने, संजय वर्मा, संग्राम पाटील, राजू बहिवाळ, संजय जाधव आदींचा समावेश होता. सोने चोरी झाली काय? अशी वारंवार पोलिसांनी विचारणा केली होती. परंतु चोरीबाबत नकार दिला गेला. पण नऊ दिवसानंतर लखो रुपयाचे ९०० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे सांगितले. यामुळे तपासाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, शनिवारी दिवसभर दोन्हीही अरोपीची घरझडती घेण्यात आली व इतर लोकांची इनकॅमेरा चौकशी सुरू केली.तपासाबाबत मार्गदर्शन पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास अधिकारी सपोनि राहिरे यांना तपासाबाबत सूक्ष्म टिप्स दिल्या. तसेच बारकाईने तपास करून सत्य बाहेर आणण्याचे आश्वासन दिले. सराफा असोसिएशनच्या भेटीनंतर तपास अधिकाऱ्यावर दडपण येऊ नये यासाठी मोराळे यांनी भेट दिलल्याची चर्चा आहे. तपासाची दिशा भरकटणार नाही- राहिरे सराफा व्यापारी शिष्टमंडळाच्या भेटीनंतर लगेचच आरोपी बंडू गव्हाणे याला घेऊन त्याचे पिंगळी येथील घर व हदगाव येथील खोलीची झडती घेण्यात आली. पण मृताचा मोबाईल अथवा सोने काहीच आढळून आले नाही. तरीही तपासाची दिशा भरकटणार नसल्याचे राहिरे यांनी सांगितले.