शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

८२व्या वर्षीही कलेला न्याय देणारा अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2017 01:37 IST

आपला उदरनिर्वाह करणे असा दिनक्रम असणारा अवलिया उतारवयातदेखील तरुणांना लाजवेल अशी कामे मोठ््या उत्साहाने करीत आहे.

आंबेठाण : वयाची ८२ वर्षे पार केलेली. परंतु पहाटे कोंबड आरवल्यापासून ते संध्याकाळी दिवस उतरणीला जाईपर्यंत आपल्या अंगात असलेली कला कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविणे आणि त्याद्वारे आपला उदरनिर्वाह करणे असा दिनक्रम असणारा अवलिया उतारवयातदेखील तरुणांना लाजवेल अशी कामे मोठ््या उत्साहाने करीत आहे. बळीराम तुकाराम कदम असे या अवलिया ज्येष्ठ कलाकाराचे नाव आहे.खेड तालुक्यातील पिंपरी बुद्रुक (ठाकूर पिंपरी) गावचे नागरिक असणाऱ्या कदमबाबांना पाहिले तर निश्चितच तरुणांना देखील लाजवेल असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. वयाची ८२ वर्षे पार केल्यानंतरसुद्धा सुतारकाम हा पारंपरिक व्यवसाय आजदेखील ते नेटाने संभाळत आहेत. सुतारकामाबरोबरच लोहारकाम, गवंडीकाम, तसेच वेल्डिंगचे कामदेखील ते अचूकपणे करतात. साधारणत: वयाची साठी पार केल्यानंतर माणूस उद्योग व्यवसाय किंवा नोकरीच्या नादी न लागता रिटायर आयुष्य जगतो परंतु बळीराम कदम यांनी या गोष्टींना छेद देत तरुणांनादेखील नवा आदर्श घालून दिला आहे.पारंपरिक काळापासून सुरु असणारा व्यवसाय आणि त्याला आधुनिकतेची जोड देत व्यवसाय करून आपल्या लाकडी हस्तकलेच्या माध्यमातून तालुक्यासह जिल्ह्यातदेखील कदम यांनी आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या हातून तयार झालेली जुन्या काळातील मोठी घरे आजही त्यांच्या कलेची साक्ष देत आहेत. तालुक्यात आजवर जी अनेक मोठी घराणी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो अशा अनेक घरांची रचना कदम यांच्या हातून झाली आहे. याशिवाय जुन्या काळात त्यांनी बनविलेल्या शाळा आजही ताठ मानेने उभ्या आहेत.माळकरी असणारे कदमबाबा आपल्या उतारवयातदेखील आळंदी आणि पंढरपूरची वारी करीत आहेत. बळीराम तुकाराम कदम हे ८२ वर्षांचा कलाकार आजही आपल्या लाकडी हस्तकलेच्या माध्यमातून शेकडो लोकांच्या अपेक्षा पूर्ण करीत आहे. सुतारकाम हा आपला पारंपरिक व्यवसाय कदम यांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरून काळानुसार बदलला आहे. त्यांची मुले आणि नातवंडेदेखील त्यांना या व्यवसायात मदत करीत आहेत. शेती व्यवसाय करीत असताना सुतारकाम हा आपला परंपरागत व्यवसायात कदम यांनी काळानुरूप बदल करीत मोठ्या शिताफीने वाढविला आहे.परिसरात किंवा कधी दूरवर असणारी जुनी घरे, जुने वाडे याशिवाय अन्य ठिकाणी मिळणारे सागवानी लाकूड खरेदी करणे आणि त्याचा वापर व्यवसायासाठी करणे हे बळीराम कदम यांचे प्रमुख काम आहे. हे सुतारकाम करीत असताना ते सागवानी लाकडापासून बनविलेली बैलगाडी, बैलगाडे, स्वयंपाकघरात वापरले जाणारे लाटणे, पोळपाट, लहान मुलांचे बाहुला-बाहुली, खेळण्याचे विविध साहित्य, लहान मुलांचे पाळणे, लग्न समारंभात झालीवर ठेवले जाणारे चौरंग, पाट अतिशय सुबक आणि आखीव-रेखीव बनवतात आणि त्याची विक्री करून कदम आपला प्रपंच चालवीत आहे. याशिवाय परिसरातील शेतकऱ्यांना नवीन शेती अवजारे बनवून देणे, त्यांची दुरुस्ती करणे अशी कामेदेखील या कलाकाराकडून केली जात आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना शेतकामात दैनंदिन वापरात लागणारे खुरपे, विळे, कुदळ, टिकाव, पहार यांसारखी अवजारे करून देतात. >दिवसेंदिवस शेती करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे त्यामुळे अनेक शेतकरी निदान लहानशी बैलगाडी तरी आपल्या घरात असावी म्हणून अशा लाकडी बैलगाड्या तयार करून घेत आहेत.याशिवाय बहुजनांचा आवडता खेळ असणाऱ्या बैलगाड्यांच्या शर्यती. असे बैलगाडेदेखील अनेक लोक आवडीने बनवून घेतात आणि हौस म्हणून घरी ठेवतात.असे काम करताना वारंवार होत असणाऱ्या भारनियमनाचा फटका देखील त्यांच्या कामाला बसत आहे. नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार वस्तू बनवून देणे आणि बनवून दिलेली वस्तू पाहिल्यानंतर ग्राहकाच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हाच आपला कामाचा खरा मोबदला असल्याचे बळीरामदादा कदम हे आवर्जून सांगतात.