शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘वर्क फ्रॉम होम’ नावाने ८२ लाखांची फसवणूक

By admin | Updated: June 19, 2016 00:54 IST

कंपनीच्या वेबपेजवर जाऊन कंपनीद्वारे पाठविलेल्या लिंक्सवर क्लिक करून घरबसल्या कमिशन मिळवा, अशी जाहिरात करून हजारो रुपये गुंतविण्यास भाग पाडून मध्य प्रदेशमधील कंपनीने

पुणे : कंपनीच्या वेबपेजवर जाऊन कंपनीद्वारे पाठविलेल्या लिंक्सवर क्लिक करून घरबसल्या कमिशन मिळवा, अशी जाहिरात करून हजारो रुपये गुंतविण्यास भाग पाडून मध्य प्रदेशमधील कंपनीने पुण्यातील ५६ लोकांची ८२ लाखांची फसवणूक केली. या गुन्ह्यातील दोघांना सायबर क्राइमच्या पथकाने उज्जैन येथून अटक केली आहे़ रामप्रकाश शिवराम गुप्ता (वय ३३, रा़ उज्जैन, मध्य प्रदेश) आणि धनंजय अजय शर्मा (वय २५, रा़ शक्तीनगर, उज्जैन, मध्य प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत़ त्यांच्याकडून २ मोबाइल, विविध बँकेचे ७ डेबिट कार्ड, ४ क्रेडिट कार्ड, २ पॅनकार्ड त्यापैकी एक एमटीएसआय अ‍ॅडव्हर्टायजिंग प्रा़ लि़ या कंपनीच्या नावे असलेला पॅनकार्ड आहे़ या कंपनीचा प्रमुख अमोल इनामदार असून, त्याने व प्रसन्ना हरणे यांनी मिळून ही कंपनी स्थापन केली होती़ याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक साकोरे यांनी सांगितले की, इनामदार याच्यावर उज्जैनमध्ये एप्रिल २०१५ मध्ये माधोनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती़ त्यात इतरांना अटकपूर्व जामीन मिळाला होता़ इनामदार जामीन मंजूर झाल्यानंतर फरार झाला आहे़ या प्रकरणी विशाल वसंत जाधव (वय ३१, रा़ शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे़ त्यांना एमटीएसआय अ‍ॅडव्हर्टायजिंग कंपनीमधून मे २०१४ मध्ये फोन आला होता़ कंपनीच्या वेबसाइटवरील विविध गुंतवणुकीच्या वर्क फ्रॉम होम स्किम्सची माहिती दिली़ जाधव यांनी १५ हजार रुपये गुंतवले़ त्यांना त्यांचा युजर आयडी व पासवर्ड देण्यात आला़ त्यानंतर, कंपनीच्या वेबपेजवर त्यांना दररोज १०० लिंक्स पाठविण्यात येत होत्या़ त्या क्लिक करून साधारण १५ सेकंदांनी बंद करणे, अशा प्रकारचे कामाचे स्वरूप होते़ पहिल्या महिन्यांमध्ये २४ टक्के रिटर्न मिळाल्याने जाधव यांचा विश्वास बसला़ त्यांनी जून २०१४ मध्ये ५० हजार रुपये गुंतविले़ जुलै २०१४ मध्ये त्यांना कामाचे रिटर्न्स न मिळाल्याने, फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ काही दिवसांनी त्यांनी फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली़ या आरोपींनी ‘शॉपिंग सेन्स मार्केटिंग’ या नावाने नवीन कंपनी सुरू केली असून, आॅनलाइन शॉपिंगच्या अ‍ॅडव्हर्टाइझच्या नावाने मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून मेंबरशिप कार्ड दिले जात आहे़ या कंपनीचे जाळे पुणे, जम्मू काश्मीर, दिल्ली, हरियाणा व दक्षिण भारतामध्ये आहे़ (प्रतिनिधी)