शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण का केली? आमदार संजय गायकवाड म्हणाले, 'वरण खराब निघाल्याने..."
3
"लोक म्हणाले, न्याय हवा असेल तर राज ठाकरेंना भेटा"; प्रिया फुके मुलासह 'शिवतीर्थ'वर पोहचल्या
4
मुंबई: आईला म्हणाला, 'लवकरच जेवायला घरी येतो' अन् ओंकारने अटल सेतूवरून मारली उडी; ३६ तासानंतरही शोध सुरूच
5
Video: स्टंपचे दोन तुकडे... Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने केला भन्नाट कारनामा
6
जमीन खणताच नशीब फळफळलं, मजुराच्या हाती लागली मौल्यवान वस्तू, काही तासांतच झाला लखपती    
7
Ahmedabad Plane Crash : विमान अपघातातील 'त्या' १९ लोकांवर गुजरात सरकारने केले अंत्यसंस्कार; पण कारण काय?
8
तुमचं जनधन खातं बंद होणार? खातेधारकांमध्ये गोंधळ, सरकारनं दिलं स्पष्टीकरण
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
10
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
11
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
12
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
13
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
14
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
15
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
16
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
17
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
18
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
19
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
20
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही

अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ८.१९ कोटींचा निधी!

By admin | Updated: July 6, 2016 01:26 IST

निधीअभावी धूळ खात पडलेली अपघातग्रस्त विद्यार्थ्यांंच्या नुकसानभरपाईची ११५५ प्रकरणे लवकरच निकाली निघणार.

संतोष वानखडे / वाशिम निधीअभावी धूळ खात पडलेली राज्यातील अपघातग्रस्त विद्यार्थ्यांंच्या नुकसानभरपाईची ११५५ प्रकरणे लवकरच निकाली निघण्याची चिन्हे आहेत. शिक्षण विभागाने ८.१९ कोटींचा निधी मंजूर केला असून, जिल्हास्तरावर निधी वितरणाची कार्यवाही सुरू आहे.विद्यार्थ्यांंच्या सुरक्षित शिक्षणासाठी शिक्षण विभागाने विविध योजना व उपक्रम अमलात आणले आहेत. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंंतच्या विद्यार्थ्यांंना संकटसमयी आर्थिक मदतीचा हात म्हणून २0१२-१३ पासून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना नियमितपणे राबविण्यात येत आहे. शिक्षण घेताना अपघात झाला तर संबंधित विद्यार्थ्याला आर्थिक स्वरूपात भरपाई दिली जाते. अपघाताचे स्वरूप पाहून आर्थिक नुकसानभरपाईची रक्कम निश्‍चित केली जाते. अपघातग्रस्त विद्यार्थ्याने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांंमार्फत गटशिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकार्‍याने माध्यमिक किंवा प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात नुकसानभरपाईचा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.२0१५-१६ या वर्षात राज्यभरातून दीड हजारावर प्रस्ताव प्राप्त झाले होते; मात्र पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध नसल्याने ११५५ प्रस्ताव धूळ खात पडले होते. यामध्ये वाशिम जिल्हय़ातील ३५ विद्यार्थ्यांंचा समावेश आहे. निधीअभावी या अपघातग्रस्त विद्यार्थ्यांंना भरपाईच्या रकमेची केवळ प्रतीक्षाच करावी लागली. विविध संघटनांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने जूनच्या तिसर्‍या आठवड्यात ८ कोटी १९ लाख ९३ हजार ६00 रुपये मंजूर करण्यात आले. सदर निधी आता जिल्हास्तरावर वितरित केला जात असून, लवकरच पात्र विद्यार्थ्यांंना नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे. या निधीवर नियंत्रण अधिकारी म्हणून शिक्षण आयुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून, जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी पात्र विद्यार्थ्यांंना निधीचे वितरित करणार आहेत.