शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

८४ व्हीआयपींच्या दिमतीला ८१२ पोलीस!

By admin | Updated: May 13, 2014 04:01 IST

: राज्यातील ८४ व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेसाठी तब्बल ८१२ पोलीस अधिकार्‍यांचा फौजफाटा तैनात करण्यात असून,

मुंबई : राज्यातील ८४ व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेसाठी तब्बल ८१२ पोलीस अधिकार्‍यांचा फौजफाटा तैनात करण्यात असून, त्यातील ६६ पोलीस कर्मचारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. पुणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विहार धूर्वे यांना माहिती अधिकारान्वये मिळालेल्या कागदपत्रांतून ही बाब उघड झाली आहे. सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांना ‘झेड -प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली असून, त्यात ५२ पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. शिवाय सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली असून, त्यात १४ पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. बारा व्हीआयपींना ‘झेड-प्लस’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. यात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्यपाल शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा समावेश आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी ४६, अजित पवार यांच्यासाठी ३१, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी २५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनाही ‘झेड’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. आ. प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, आमच्या कुटुंबाला इतक्या सुरक्षाव्यवस्थेची आवश्यकता नाही. हा एक प्रोटोकॉलचा भाग आहे. आम्ही काही इतक्या सुरक्षाव्यवस्थेची मागणी केलेली नाही. शिवाय मी स्वत: याबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांसह पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात अनावश्यक सुरक्षाव्यवस्था काढून टाकण्याची मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)