शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

गणेशोत्सवासाठी सुटणार ८०५ बस

By admin | Updated: August 27, 2016 04:21 IST

कोकणात जाण्यासाठी यंदा महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने सुमारे ८५० एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला होता.

पंकज रोडेकर,

ठाणे- गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी यंदा महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने सुमारे ८५० एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत त्यातील ८०५ एसटी बसेसचे बुकिंग पूर्ण झाले आहे. यामध्ये सर्वाधिक ४२७ बसेस या ग्रुपद्वारे बुक झाल्या आहेत. तसेच यंदा सुरू केलेल्या मोबाइल अ‍ॅपमुळे आॅनलॉईन बुकींगलाही चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.गणेशोत्सवासाठी कोकणातील गुहाघर, दापोली, खेड, चिपळूण येथे जाणाऱ्या भक्तांकरिता यंदा एसटीच्या ठाणे विभागातील ८ डेपोमधून ८५० बस सोडण्याचे नियोजन केले आहे. या ८ डेपोतून ३१ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान या जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्यांचे आरक्षण एक महिना अगोदर संगणकाद्वारे उपलब्ध करून दिले . तसेच ४० दिवस अगोदर ग्रुपचे आरक्षण सुरू करून त्यासाठी आगार व्यवस्थापकांकडे संपर्क साधण्यास सांगितले होते. तसेच गावाहून परतताना काही गोंधळ होऊ नये म्हणून परतीच्या आरक्षणासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली असून परतीचा प्रवास हा १० ते १५ सप्टेंबरदरम्यान असणार आहे. >सर्वाधिक गाड्या बोरिवली, ठाणे येथूनयंदा सर्वाधिक ३०० एसटी बसेस बोरीवली येथून सोडण्यात येणार आहेत. त्या पाठोपाठ २१९ ठाणे खोपट, विठ्ठलवाडी-१००, भांडूप -१००,कल्याण-४५, भाईंदर-४० आणि मुलूंड -२४ अशा ८५० गाड्यांचे नियोजन केले होते. त्यापैकी ८०५ गाड्यांचे बुकींग झाले असून यात ३७६ गाड्यांचे आॅनलाईन तर ४२७ गाड्यांचे ग्रुपद्वारे बुकींग झाले आहे.