शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

‘त्याच्या’ झोपडीत ८० पदकांची रेलचेल

By admin | Updated: November 18, 2014 02:23 IST

घरात अठराविश्व दारिद्र्य, वडील आजारी असल्याने अंथरुणाला खिळून, आई रोजंदारीवर कामाला जाऊन संसाराचा गाडा ओढते,

भाऊसाहेब येवले, राहुरीघरात अठराविश्व दारिद्र्य, वडील आजारी असल्याने अंथरुणाला खिळून, आई रोजंदारीवर कामाला जाऊन संसाराचा गाडा ओढते, अशाही परिस्थितीत राहुरी येथील झोपडीत राहणाऱ्या सखाराम बर्डे या युवकाने बॉडी बिल्डिंग स्पर्धेत जिल्हा व राज्य पातळीवर तब्बल ८० पदकांची कमाई केली आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे त्याचे स्वप्न आहे, परंतु त्यासाठी एखाद्या प्रायोजकाच्या मदतीची गरज आहे. सखारामचे वडील शांताराम यांना दम्याचा विकार असल्याने ते घरी असतात़ आई १२० रुपये रोजंदारीवर काम करते. आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर अरनॉल्ड श्वेइनेगर यांचा फोटो पाहून सखारामने जागतिक पातळीवर करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगले़ वयाच्या १५व्या वर्षी सखारामने पहिले पदक कमावले, तेव्हाच त्याची क्षमता सिद्ध झाली होती.आर्थिक अडचणींमुळे बारावीनंतर सखारामला शिक्षण अर्धवट सोडावे लागले़ राज्यस्तरीय मोरेश्वर श्री, छत्रपती चषक, महापौर चषक, नगरश्री अशा स्पर्धा त्याने जिंकल्या. कधी पेरू-आंबे उतरविणे, कधी मोलमजुरी करून तो कुटुंबाला हातभार लावतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी होण्यास पुणे अथवा मुंबई येथे सरावाची गरज आहे. तसेच दररोजच्या खुराकाचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने सखारामच्या यशावर मर्यादा येत आहेत. रेशन कार्डवर मिळणाऱ्या तीन रुपये किलो तांदळावर त्याचे कुटुंब उपजीविका करते़ आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखविण्यासाठी सखारामने अनेक नेते व अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवले़ मात्र आश्वासनाशिवाय त्याच्या पदरात काहीही पडले नाही़ आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे त्याचे स्वप्न आहे, परंतु त्यासाठी एखाद्या प्रायोजकाच्या मदतीची त्याला गरज आहे.