शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

कर्मचाऱ्याच्या घरातून ८ लाख जप्त

By admin | Updated: July 20, 2016 05:52 IST

हिरानंदानी किडनी रॅकेटप्रकरणी अटकेत असलेल्या वैद्यकीय समाजसेवा विभागाचे सहायक व्यवस्थापक नीलेश कांबळेच्या घरातून ८ लाख रुपयांची रोकड जप्त

मनीषा म्हात्रे, पूजा दामले

मुंबई- हिरानंदानी किडनी रॅकेटप्रकरणी अटकेत असलेल्या वैद्यकीय समाजसेवा विभागाचे सहायक व्यवस्थापक नीलेश कांबळेच्या घरातून ८ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणात गुजरातहून युसुफ शहा या सातव्या आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली आहे.पनवेल येथील रहिवासी कांबळे गेल्या चार वर्षांपासून पवई हिरानंदानी रुग्णालयात कार्यरत आहे. जास्त पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी कांबळेने किडनी विक्रीचा धंदा सुरू केला. १४ जुलै रोजी पवई पोलिसांनी हे किडनी रॅके ट उघडकीस आणताच कांबळेंचे बिंग फुटले. पोलिसांनी कांबळे याच्या पनवेल येथील घरातून ८ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. गेल्या चार वर्षांत त्याने किती प्रत्यारोपणे केले याबाबत पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. या किडनी रॅकेटमधील ही रक्कम असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ७ बनावट कागदपत्रांमुळे पालिका प्रशासनही जाळ्यात ओढले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सातही आरोपींना २२ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. >विवाह नोंदणी, जन्मदाखला रेशनिंग कार्डही होते बनावटहिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटप्रकरणी पोलिसांनी ७ बनावट कागदपत्रे जप्त केली आहे. या कागदपत्रांमध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्मदाखला, रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र अशा कागदपत्रांचा समावेश आहे. त्यामुळे ही कागदपत्रे संबंधित यंत्रणेतील कर्मचाऱ्याला हाताशी धरून बनविल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. गुजरात येथील रहिवासी असलेल्या ब्रीजकिशोर जैस्वाल यांची पत्नी असल्याचे भासवून, रेखादेवी प्रसाद म्हणजे शोभा ठाकूर या किडनी दाता म्हणून तयार झाल्या. त्याही मूळच्या गुजरात येथील रहिवासी आहेत. या गुन्ह्यात जैस्वालसहित रेखाही वाँटेड आरोपी असून, दोघांनाही डिस्जार्ज मिळताच अटक करण्यात येणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी रेशनिंग कार्ड, २४ डिसेंबर १९९४ चे विवाह नोंदणी प्रमाणपत्र, तसेच महानगरपालिकेच्या जी नॉर्थ विभागाने दिलेला रेखादेवी प्रसाद यांचा २९ जानेवारी १९७५ चा जन्म दाखला, पालिकेच्या ई-वॉर्डकडून दिलेला ब्रिजकिशोर लक्ष्मणप्रसाद यांचा जन्म दाखला, अशोक कुमार ब्रिदेश्वरी याचे निवडणूक आयोगाचे ओळखपत्र आणि आधार कार्ड, तसेच रेखादेवी आणि ब्रिजकिशोर जैस्वाल यांच्या फोटोसह नोटरी करण्यात आलेला डोनर फॉर्म अशा कागदपत्रांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे ही कागदपत्रे देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही टांगती तलवार आहे.