शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती ग्राहकाला ८ लाखांचे वीजबिल

By admin | Updated: May 23, 2016 02:21 IST

वाडा वीजवितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरू असून या कारभाराचा फटका एका घरगुती ग्राहकाला बसला असून त्यांना कंपनीने ८ लाखांचे वीजिबल आकारल्याने ग्राहकाने तीव्र संताप व्यक्त केला

वाडा : दि. २२ वाडा वीजवितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरू असून या कारभाराचा फटका एका घरगुती ग्राहकाला बसला असून त्यांना कंपनीने ८ लाखांचे वीजिबल आकारल्याने ग्राहकाने तीव्र संताप व्यक्त केला असून वीज बिलाची दुरूस्ती न केल्यास महावितरणच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. वाडा तालुक्यातील कुडूस येथील ग्राहक प्रकाश शेटे यांचा ग्राहक क्र मांक ०१०५२३०३९७१ असा असून त्यांच्याकडे घरगुती वापराचे कनेक्शन आहे. यापूर्वी येणारे बील हे सरासरी दोन ते तीन हजार रूपये येत असताना एप्रिल २०१६ चे बील ७ लाख ५३ हजार ९६० रूपये इतके आले. अवास्तव बिलाबाबत वाडा येथे चौकशी केली असता ते भरण्याचा सल्ला दिला. त्यानंतर प्रकाश शेटे यांनी कल्याण येथील ग्राहक ग्रीव्हन्स रिड्रेसल फोरम याच्याकडे तक्र ार केली. त्यांनी सर्व कागदपत्रे व परिस्थितीचा अभ्यास करून सदरचे बील रद्द ठरवून प्रत्यक्ष नव्याने मीटर रिडींग घेऊन योग्य बील आकारण्याचा आदेश दिला. मात्र सदरच्या आदेशाला केराची टोपली दाखवून एप्रिल महिन्यातील बिलावर दंड व अन्य कर आकारून मे महिन्यातील बील ८ लाख १६ हजार ६१० रूपये दिले. यामुळे शेटे व त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने वैद्यकीय उपचार घ्यावे लागले असे निवेदनात नमूद केले आहे. (वार्ताहर)