शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेत ८ कोटी ५२ लाखाचा कर्जवाटप घोटाळा

By admin | Updated: June 8, 2017 21:14 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित ८ कोटी ५२ लाख रुपयांच्या कर्जवाटप घोटाळा प्रकरणी बुधवारी रात्री तडकाफडकी बँकेचे

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 8 - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित ८ कोटी ५२ लाख रुपयांच्या कर्जवाटप घोटाळा प्रकरणी बुधवारी रात्री तडकाफडकी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील, संचालक काँग्रेसचे सिल्लोड विधानसभा मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार, पैठण विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांच्यासह २२ संचालक , बँकेचे अधिकारी -कर्मचारी आणि २२ सहकारी सोसायट्यांंविरूद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यांमुळे सहकारक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना आर्थिक गुन्हेशाखेकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक अ‍ॅड. सदाशिव गायके यांनी याविषयी वर्षभरापूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. २०११ ते २०१४ या कालावधीत जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने बेकायदेशीर पद्धतीने विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांना कर्जवाटप केले. ज्या सोसायट्यांना कर्ज वाटप करण्यात आल्या त्या संचालक मंडळाच्या नातेवाईकांच्या आहेत अथवा त्यांच्या मर्जीतील लोकांच्या असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तक्रार अर्जाची चौकशी वर्षभरापासून आर्थिक गुन्हेशाखेचे अधिकारी कर्मचारी करीत होते. प्राथमिक चौकशीत बँकेच्या संचालक मंडळाने मर्जीतील आणि नातेवाईकांच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना तब्बल ८ कोटी ५२ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले. एवढेच नव्हे तर त्यांनी हे कर्ज माफही करून टाकल्याचे समोर आआले. संचालक मंडळाच्या या निर्णयामुळे बँकेचे क ोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले. दरम्यान पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना याप्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी आर्थिक गुन्हेशाखेला याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच सहायक पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे आणि कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराला सोबत घेऊन क्रांतीचौक ठाण्यात बुधवारी रात्री दिड वाजेच्या सुमारास फिर्याद नोंदविली. या फिर्यादीनुसार बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश पाटील, आ. अब्दुल सत्तार, आ. संदीपान भुमरे, शांतीलाल छापरवाल, जयराम साळुंके यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सदस्य, बँकेचे मुख्य व्यवस्थापक तसेच लाभधारक २२ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांचा आरोपीमध्ये समावेश आहे.सर्व आरोपी हजर होण्याच्या नोटीसा-गुन्हा दाखल झालेले बहुतेक सर्व आरोपी हे राजकीय क्षेत्रातील आहेत.यामुळे त्यांना कायदेशीर नोटीसा पाठवून हजर होण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी आर्थिक गुन्हेशाखेकडून देण्यात येत आहे. आयुक्तांच्या आदेशाने बुधवारी या नोटीसा पाठविण्याची कार्यवाही सुरू होती.