शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

७, ८ फेब्रुवारीला आकाशात ग्रहांची माळ

By admin | Updated: January 29, 2016 19:39 IST

येणाऱ्या ७-८ फेब्रुवारी पर्यंत आपल्याला आकाशात नुसत्या डोळ्यानी दिसणारे सर्व ग्रह म्हणजे बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हे एका वेळीच बघता येतील.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २९ -  येणाऱ्या ७-८ फेब्रुवारी पर्यंत आपल्याला आकाशात नुसत्या डोळ्यानी दिसणारे सर्व ग्रह म्हणजे बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हे एका वेळीच बघता येतील. बघण्याची वेळ  सूर्योदया पूर्वी साधारण तास भर आधी असेल. सूर्योदया पूर्वी तास भर आधी आपल्याला गुरू हा पश्चिम क्षितीजावर बराच वर दिसेल. आकाशाच्या या भागात हा सर्वात प्रखर खगोल असणार आहे. गुरू च्या खाली जो प्रखर तारा दिसेल तो म्हणजे मघा. तर पूर्व क्षितीजावर आपल्याला सर्वात वर  जवळ जवळ डोक्यावर मंगळ दिसेल. याला याच्या लाल रंगा मुळे सहज ओळखता येऊ शकेल. मंगळाच्या खाली मग क्रमशः शनी, शुक्र आणि बुध असतील.शुक्र हा क्षितीजाच्या खूप जवळ आहे. हा ही आपल्याला सहज ओळखता येऊ शकेल कारण या भागातील हा सर्वात सर्वात प्रखर ग्रह आहे. शुक्र आणि मंगळ यांच्या बरोबर मधे तुम्हाला शनी दिसेल. तर शुक्राच्या खाली बुध आहे. जर तुम्ही मंगळ शनी आणि शुक्र यांना काल्पनिक रेशेने जोडलेत तर त्याच रेशेवर पण शुक्राच्या खाली बुध आहे.या ग्रहांची ओळख पटण्या करता आपण चंद्राची मदत पण घेऊ शकतो. २ फेब्रु. ला सुमारे अर्धा प्रकाशित चंद्र मंगळाच्या खाली पण डाव्या बाजूला असेल. तर ४ ता. तो आपल्याला शनी च्या डाव्या बाजूला पण थोडा वर दिसेल. मग ६ ता. चंद्राची बारीक कोर आपल्याला शुक्राच्या वर दिसु शकेल तर त्याच्या खाली बुध असेल. अर्थात यांना बघण्या करता आकाश निरभ्र तर हवेच तसेच शुक्र आणि बुध हे ब-या पैकी क्षितीजा जवळ आहेत त्या मुळे यांना बघण्या साठी पूर्व दिशेस क्षितीजा पर्यंत आकाश दिसायाल हवे.