रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
शिवसेना-भाजपातील वर्चस्वाच्या भांडणामध्ये 78 जागांचा तिढा कायम असल्याने महायुतीचे जागावाटप रखडले आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशसह राजस्थान आणि गुजरातमधील पोटनिवडणुकीचे निकाल विरोधात गेल्यामुळे भाजपाने दोन पाऊल मागे घेण्याची तयारी दर्शविली असल्याचे समजते. भाजपाध्यक्ष अमित शहा उद्या मुंबई भेटीवर येत असून, तत्पूर्वी आज प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र भुसारी हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राजधानीतील निवासस्थानी सकाळी साडे अकरा वाजता भेटले. शिवसेना ताठरपणा सोडणारच नसेल, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढण्याचा पर्याय तपासला पाहिजे, यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
मागील तीन निवडणुकींत शिवसेना 59 व भाजपा 19 ठिकाणी सातत्याने पराभूत होत आहे. ते मतदारसंघ या वेळी बदलले पाहिजेत. निदान 5क् जागांवर तरी फेरविचार केला पाहिजे. दीड महिन्यापासून यावरच जागावाटपाचे घोडे अडले आहे. शहा यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री मुंबईत ही सारी प्रकरणो निस्तारली जाणार असून, गरज पडल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही मुंबईत पाचारण केले येईल, असे सूत्रंनी सांगितले. तथापि, ठाकरे यांच्याशी चर्चा कधी करायची ते वेळेवरच ठरेल. किती जागांची अदलाबदल करायची ते शहा, गडकरी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ठरेल.
सेनेचा निर्णय शुक्रवारी
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्याकरिता येत्या शुक्रवारी 19 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता शिवसेना भवन येथे बैठक बोलावली आहे.