शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

७७८ महाविद्यालयांचे होणार आॅडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 06:29 IST

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व ७७८ महाविद्यालये आणि संस्थांचे त्रयस्थ शैक्षणिक आॅडिट करण्यात येणार असून त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गुरुवारी एका टास्क फोर्सची स्थापना केली.

विशेष प्रतिनिधीमुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व ७७८ महाविद्यालये आणि संस्थांचे त्रयस्थ शैक्षणिक आॅडिट करण्यात येणार असून त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गुरुवारी एका टास्क फोर्सची स्थापना केली.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प; मुंबईचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.आर.एस.माळी, वझे केळकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.गोविंद पारटकर आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव व्यंकटरमणी हे या टास्क फोर्सचे सदस्य तर राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने हे सदस्य सचिव असतील.युजीसी, एआयसीटीई, बार कौन्सिल आॅफ इंडिया, कौन्सिल आॅफ आर्किटेक्चर, एनसीटीई आदी प्राधिकरणांनी निश्चित केलेल्या निकषांनुसार मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व संस्थांमध्ये भौतिक सोईसुविधा आहेत की नाही याचे आॅडिट केले जाईल. महाविद्यालये व त्यांचे अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा तुकड्या आदींचे संलग्नीकरण व त्यांचे नूतनीकरण विहित तरतुदींनुसार करण्यात येत आहे व त्यानुसार आवश्यक त्या शुल्काचा भरणा/वसुली विद्यापीठाकडे मजा होत आहे की नाही याचेही आॅडिट केले जाईल.या शिवाय, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव तसेच गृह विभागाचे प्रधान सचिव हे या समितीचे सदस्य तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव हे सदस्य सचिव असतील. टास्कफोर्सला आवश्यक तेव्हा मार्गदर्शन करणे, टास्क फोर्सने तयार केलेल्या अहवालाच्या आधारे कृति-आराखडा (अ‍ॅक्शन प्लॅन) तयार करून कुलपतींकडे सादर करणे, ज्या संस्थांनी नियमांचे उल्लंघन केले आहे त्यांच्याविरुद्ध कारवाईची शिफारस करण्याचे अधिकार समितीला असतील.प्रचलित यंत्रणा व कार्यपद्धतीमध्ये करावयाच्या सुधारणा आणि उपाययोजना सुचविणे आणि महाविद्यालयांनी नियमांच्या उल्लंघनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विद्यापीठास मार्गदर्शक सूचना देण्याचे काम ही समिती करेल.विद्यार्थी व पालकांना विनाकारण मनस्तापमुंबई विद्यापीठाने वापरलेल्या आॅन स्क्रीन मार्किंग (ओएसएम) प्रणालीवर टॅग केलेल्या शिक्षकांचा अत्यल्प सहभाग राहिल्याने तसेच हे मूल्यांकन वेळेत न होऊ शकल्याने विद्यार्थी व पालकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला, असे खापरही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने फोडले आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयnewsबातम्या