शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

सहा वर्षात ७७ हजार कुष्ठरुग्णांवर उपचार

By admin | Updated: October 7, 2014 23:27 IST

कुष्ठरोग निर्मुलन पंधरवडा : औषधोपचारासह जनजागृतीचीही गरज.

नीलेश शहाकार/बुलडाणा कुष्ठरोगाविषयी समाजात मोठय़ा प्रमाणात जनजागृती झाली, तरच समाजात दडून राहीलेले कुष्ठरुग्ण स्वत:हून औषधोपचारासाठी समोर येतील. या आजाराच्या निर्मुलनासाठी सुरुकरण्यात आलेल्या राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत गत सहा वर्षांत आरोग्य विभागाकडून ७७९४६ रुग्णाचे कुष्ठरोग निर्मुलन करण्यात आले.केंद्र शासनाकडून २0१७ पर्यंत बारा पंचवार्षिक योजनांमध्ये कुष्ठरोग दुरीकरण मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेतून प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासून राज्यात विशेष कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येते. याअंतर्गत ज्या तालुक्यांमध्ये नवीन कुष्ठरुग्णांचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे १0 पेक्षा जास्त आहे, अशा तालुक्यांमध्ये विशेष कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाद्वारे जनतेमध्ये जनजागृतीही करण्यात आली.या मोहिमेतून वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, नगर विकास विभाग, राज्य वाहतूक विभाग, माहिती व प्रसिद्धी माध्यमे, प्रसार भारती, रेल्वे, एसटी महामंडळ, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागरी आरोग्य केंद्र यांचा सहभाग घेण्यात आला. विशेष पथकांची स्थापन करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यांच्यामार्फत संशयित कुष्ठरुग्ण शोधून त्यांचे कुष्ठरोगाबाबत निदान करण्यात आले. गत सहा वर्षात राज्यभरात ९२ हजार ६00 कुष्ठरोग रुग्णांचे निदान करुन, त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. कुष्ठरोग आरोग्य शिक्षण जनजागरण मोहीम ऑक्टोबर महिन्याच्या पंधरवड्यापर्यत सर्वत्र राबविण्यात येत आहे. या जनजागृती मोहीमेतून विविध माध्यमाद्वारे कु ष्ठरोगाविषयीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. तसेच नविन रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचारही केले जाणार असल्याचे बुलडाणा येथील नागरी कुष्ठरोग केंद्राचे डॉ.ई.बी.शिंदे यांनी सांगीतले. *अमरावती विभागात आढळलेले रुग्णजिल्हा                 रुग्णअकोला                २७३वाशिम                 १७५अमरावती             ४८३बुलडाणा               २७५यवतमाळ             २७५उपचारानंतर बरे झालेले कुष्ठरुग्णवर्ष           रुग्ण                     बरे झालेले रुग्ण२00८-0९    १४२७४                  ११५१६२00९-१0    १५0७१                  १४१५८२0१0-११    १५४९८                  १४४३४२0११-१२    १७८९२                  १५४९८२0१२-१३    १८७१५                  १७३९८२0१३-१४    १११५0                    ४९४२(जूनपर्यंत)