शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

७६ विद्यार्थ्यांची परीक्षा खासगी क्लासमध्ये!

By admin | Updated: May 24, 2017 03:25 IST

बोरीवलीच्या नामदार अजित पवार ज्युनियर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिकणाऱ्या जवळपास ७६ विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ही

गौरी टेंबकर-कलगुटकर । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बोरीवलीच्या नामदार अजित पवार ज्युनियर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिकणाऱ्या जवळपास ७६ विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ही चारकोपच्या एका खासगी क्लासमध्ये घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. जो पेपर कॉलेजमध्ये सोडविणे अपेक्षित होते, तो या मुलांनी ट्युशनमध्ये सोडविला. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून कॉलेजचे प्राचार्य प्रशांत गायकवाड व क्लासचालक मकरंद गोडस यांना चारकोप पोलिसांनी अटक केली आहे.औरंगाबादमध्ये स्थानिक नेत्याच्या घरी इंजिनीअरिंगचे विद्यार्थी परीक्षा देत असल्याची घटना ताजी असताना शिक्षणाच्या बाजारीकरणाचा हा आणखी एक प्रकार चारकोपमध्ये उघडकीस आला आहे. बोरीवली पश्चिमच्या देवीदास लेनमध्ये ‘राम पंडागळे एज्युकेशन ट्रस्टचे नामदार अजित पवार ज्युनियर कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात हे ७६ विद्यार्थी शिकतात. तर चारकोपच्या मकरंद गोडस क्लासमध्ये ही मुले खासगी ट्युशनसाठी जातात. ट्युशनसाठी या विद्यार्थ्यांना क्लासचालक मकरंद गोडस (४६) याने मोठी फी आकारली आहे. महाविद्यालयातील विज्ञान विषयाची परीक्षा ही गोडसच्या खासगी क्लासमध्ये घेण्यात आल्याची तक्रार कॉलेजमधील प्राचार्यप्रशांत अरविंद गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी चारकोप पोलिसांकडे केली होती. फेब्रुवारी, २०१७ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली. हा सगळा प्रकार गेल्या वर्षभरापासून गायकवाड यांना माहिती असल्याचे त्यात समोर आले. तसेच सहामाही परीक्षेत हाच प्रकार घडल्याचे उघड झाले. त्यामुळे सोमवारी रात्री मकरंद गोडस आणि प्रशांत गायकवाड या दोघांनाही अटक केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले. गायकवाड यांनी गोडस विरोधात आधीच तक्रार का केली नाही? याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थी आणि पालक चिंतित झाले आहेत. कॉलेजच्या अन्य शिक्षकांच्या सहभागाबाबत तपास सुरू आहे.